धक्कादायक! प्रियकराचा प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 20:31 IST2020-02-12T20:30:52+5:302020-02-12T20:31:32+5:30
पीडित युवतीला आई व भावाला मारण्याची धमकी देत नराधमाने केला बलात्कार

धक्कादायक! प्रियकराचा प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार
पुणे : कामाच्या निमित्ताने ओळख वाढवून प्रेम संबंधात असणार्या प्रियकराने प्रेयसीच्या पंधरा वर्षीय मुलीवरच बलात्कार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून रमेश वैगांणे (वय 30,रा.ताडीवाला रोड, पुणे) याच्याविरूध्द बाल लैगिंक अत्याचार कायदा (पॉस्को) सह बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलीच्या आईचा घटस्फोट झाला असून तिला एक मुलगा व एक मुलगी आहे. काही दिवसांपासून कामाच्या निमित्ताने झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झाले होते. त्यामुळे तो त्यांच्या येरवडा येथील घरी येत असे. आर्थिक व्यवहारातून त्यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडित युवतीला आई व भावाला मारण्याची धमकी देत नराधमाने बलात्कार केला. याप्रकरणी आरोपी रमेश वैंगाणे याच्याविरूध्द पॉस्को व बलात्काराचा गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयाने 15 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदूम करत आहेत