शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादी पक्षही संपेल : शिवाजीराव आढळराव पाटील
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:10 IST2019-09-09T20:09:47+5:302019-09-09T20:10:34+5:30
इंदापूरमध्ये एक वजनदार नेता भाजपत प्रवेश करणार आहे, मात्र त्या ठिकाणी शिवसेनेला जागा जाणार आहे...

शिवस्वराज्य यात्रा संपली की राष्ट्रवादी पक्षही संपेल : शिवाजीराव आढळराव पाटील
पिंपरी : शिवस्वराज्य यात्रा अमोल कोल्हे यांना घेऊन राष्ट्रवादीने सुरू केली आहे. ज्या ठिकाणी यात्रा होते तेथील लोक राष्ट्रवादीला सोडून जातील, अशी स्थिती आहे. त्यामुळे शिवस्वराज्य यात्रा संपली की पक्ष संपेल. अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव पाटील यांनी भोसरीत सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उपजिल्हाप्रमुख नीलेश मुटके, माजी गटनेत्या सुलभा उबाळे, कामगार नेते इरफान सय्यद, माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, उपशहरप्रमुख नेताजी काशिद, उपशहरप्रमुख आबा लांडगे आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, माझा पराभव राष्ट्रवादी किंवा अमोल कोल्हे यांच्याकडून झाला नाही. संभाजी महाराज व शिवाजी महाराज मालिकेतील भूमिकेच्या भावनिक राजकारणामुळे झाला आहे. शिरूर लोकसभेत माझा पराभव हा भावनेचे राजकारण व जातीय समीकरणाने झाला. अमोल कोल्हे यांनी शिरूर लोकसभेसाठी किती वेळ काढला, भोसरीमध्ये किती वेळा आले, हडपसरमध्येही फिरकलेच नाही, त्यामुळे नागरिक आता पश्चाताप करत आहेत. भोसरी आणि हडपसरला ते कितीवेळा आले. याचाच फायदा विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला होईल,