मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 17:02 IST2018-07-26T17:00:42+5:302018-07-26T17:02:34+5:30
गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली आहे.

मराठा आरक्षणाचे महापालिकेत पडसाद : महापौरांसमोर शिवसेनेची तोडफोड
पुणे : संपूर्ण राज्यात मराठा समाजातर्फे आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. या संदर्भात तीव्र आंदोलन सुरु असताना पुणे महापालिकेतही त्याचे पडसाद उमटले आहेत. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेचे गटनेते संजय भोसले यांनी थेट महापौरांच्या आसनासमोर तोडफोड केली आहे.
गुरुवारी सर्वसाधारण सभा सुरु असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसेचे आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले. शिवसेनेने त्यावेळी मानदंड पळवण्याचाही प्रयत्न केला, मात्र भाजप सदस्य दीपक पोटे यांनी तो एकाबाजूने धरून ठेवल्याने त्यात त्यांना अपयश आले. ही घोषणाबाजी सुरु असताना अचानक भोसले यांनी महापौरांच्या समोरील रेलिंगवरून आता उडी घेऊन त्यांच्या टेबलावरील कुंडी आणि काचेचा ग्लास फोडला. संतप्त भोसले यांना इतर सदस्यांनी आवरल्यामुळे पुढील तोडफोड टाळली. अखेर घोषबाजीच्या गोंधळातच सत्ताधारी भाजपने सभा तहकुबी मांडली आणि सभा सहकुबी करण्यात आली.