जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 11:25 IST2024-12-06T11:22:27+5:302024-12-06T11:25:12+5:30

पुणे :  जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार ...

'Shivneri Hapus mango from Junnar GI rated MP Dr. Success to Amol Kolhe efforts   | जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश  

जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रयत्नांना यश  

पुणे : जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावच्या ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे प्रयत्न आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, केंद्र सरकारने 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन बहाल केले. जुन्नर तालुक्यात आंबा उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा हापूस आंबा वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी ओळखला जातो. त्यामुळे जुन्नरच्या हापूस आंब्याला 'शिवनेरी हापूस' म्हणून जीआय मानांकन मिळावे, यासाठी नारायणगावचे ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्र प्रयत्नशील होते.  

शिवनेरी हापूस आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी खासदार डॉ. कोल्हे सन २०२२ पासून सातत्याने पाठपुरावा करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून, जशी काश्मिरी केशर, बनारसी साडी किंवा दार्जिलिंग चहा या धर्तीवर जुन्नर तालुक्यातील आंब्याला 'शिवनेरी हापूस आंबा' अशी ओळख मिळाली आहे.

यासंदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, जुन्नरच्या 'शिवनेरी हापूस' आंब्याला जीआय मानांकन मिळावे, यासाठी ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यानुसार वेळोवेळी प्रस्तावातील त्रुटींची पूर्तता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. त्यामुळे या भागाचा लोकप्रतिनिधी खासदार म्हणून केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे पत्रव्यवहार व पाठपुरावा करीत होतो. त्यामुळे शिवनेरी हापूसला जीआय मानांकन मिळवून देण्यात खारीचा वाटा उचलता आला, याचा विशेष आनंद आहे. त्याचबरोबर पालकमंत्री अजितदादा पवार व माजी आमदार अतुल बेनके, अनिल तात्या मेहेर यांचेही याकामी सहकार्य मिळाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

जीआय मानांकन म्हणजे काय?

  •  एखादे उत्पादन ठराविक भौगोलिक परिस्थितीत विशिष्ट भागात घेतले जात असेल आणि त्याला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. हे मानांकन मिळाल्यास त्या उत्पादनाचे उगमस्थान निश्चित होते. नफा तसेच गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी उत्पादकांना त्याचा फायदा होतो.
     
  • जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडीत आहे. कारण वेगवेगळ्ळ्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादित केले जाणाऱ्या उत्पादनाची गुणवत्ता वेगवेगळी असू शकते. ही ओळख कायम ठेवणे जीआय मानांकनामुळे शक्य होते.  

Web Title: 'Shivneri Hapus mango from Junnar GI rated MP Dr. Success to Amol Kolhe efforts  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.