‘शिवनेरी’च्या डिकीदरवाजाचा फटका बसून दोघांचा मृत्यू  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 04:47 IST2018-01-30T04:46:49+5:302018-01-30T04:47:04+5:30

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसच्या डीकीचा दरवाजा व्यवस्थित न लावला गेल्याने त्याचा फटका बसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री फुगेवाडी येथे जुना पुणे-मुंबई रस्त्यावर सर्वत्र विहार चौकात घडली.

 Shivnarei's Dikidarajaja suffered a death and died of both | ‘शिवनेरी’च्या डिकीदरवाजाचा फटका बसून दोघांचा मृत्यू  

‘शिवनेरी’च्या डिकीदरवाजाचा फटका बसून दोघांचा मृत्यू  

पुणे : पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवनेरी बसच्या डीकीचा दरवाजा व्यवस्थित न लावला गेल्याने त्याचा फटका बसून रस्त्याच्या कडेला थांबलेल्या दोन प्रवाशांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री फुगेवाडी येथे जुना पुणे-मुंबई रस्त्यावर सर्वत्र विहार चौकात घडली.
दीपक भास्कर सोरटे (५५, रा. औंध) व जॉर्ज आशीर्वादन (२७, रा. कासारवाडी) अशी मृतांची नावे आहेत. एकाचा हात मनगटाजवळ फ्रॅक्चर झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोरटे आणि आशीर्वादन हे दोघे पीएमटी बसमधून उतरून रस्त्याच्या बाजूला बोलत उभे राहिले होते. त्या वेळी मुंबईच्या दिशेने जाणाºया शिवनेरी बसच्या डीकीचा दरवाजा अचानक धाडकन उघडला आणि त्याचा जोरदार फटका तिघांना बसला. दोघांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. खडकी पोलिसांनी बसचालक संतोष मदने यास अटक केली आहे.

Web Title:  Shivnarei's Dikidarajaja suffered a death and died of both