शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Shivajinagar Vidhan Sabha Election Result 2024: २०१९ मध्ये ५ हजारने शिरोळे विजयी; आता ३६ हजारांचा लीड, शिवाजीनगरमध्ये विरोधकांना भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2024 17:28 IST

Shivajinagar Assembly Election 2024 Result २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला

पुणे : निवडणुकीच्या आधी तब्बल वर्षभरापूर्वीची गोष्ट. पक्षांच्या वतीने सर्वेक्षण वगैरे होत असतात. भाजपनेही तसे सर्वेक्षण केले. त्यात शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ डेंजर झोनमध्ये दाखवला होता. नंतरही दोन-तीन सर्वेक्षणे झाली. त्यातही हा मतदारसंघ डेंजर झोनमध्येच होता. त्यामुळे भाजपचे आताचे विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची उमेदवारी गेली, अशी चर्चाही सुरू झाली.

पण मितभाषी असलेल्या शिरोळे यांनी संयमाने त्या सर्वेक्षणाला तोंड दिले. न बाेलता मतदारसंघामध्ये फिरणे सुरू केले. थेट लोकांमध्ये जाऊन तिथे बसून त्यांच्या समस्या ऐकायच्या, त्या सोडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायचे. ती मागणी नवोदिताने किंवा एखाद्या नगरसेवकाने केलेली गोष्ट ते सातत्याने करत गेले. त्याचाच फायदा शिरोळे यांना या निवडणुकीत झाला. थोडी मदत काँग्रेसचीही झाली. तिथे काँग्रेसच्या मनिष आनंद यांनी बंडखोरी केली.आजारपणामुळे आल्या प्रचाराला मर्यादा

काँग्रेसचे अधिकृत उमेदवार असलेले दत्ता बहिरट आजारी पडले. त्यामुळे त्यांच्या प्रचारावर मर्यादा आल्या. त्यामुळे शिरोळे यांना मोकळे रान मिळाले; पण त्यांना झालेले मतदान इतके जास्त आहे की बंडखोरी झाली नसती तरी ते निवडून आलेच असते. याही मतदारसंघात काँग्रेसने निवडणूक जवळपास सोडून दिल्यातच जमा होती. अखेरच्या दोन दिवसांत सभा, फेऱ्या, रॅली अशी धूम उडवली.

राज्यस्तरीय नेते प्रचारात हाेते कुठे?

स्वत: उमेदवार मागील निवडणुकीत पराभूत झाल्यावर साडेचार वर्षे मतदारसंघातच नव्हे तर पक्षातही सक्रिय नव्हते. त्यामुळे त्यांना मतदारसंघात धूम उडवता आलीच नाही. त्या तुलनेत शिरोळे मतदारांना भेटत होते, बोलत होते. पक्षानेही त्यांना प्रचार सभा दिली. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मदत केली. राज्यस्तरीय नेत्यांनी त्यांच्या निवडणुकीकडे लक्ष दिले. त्याचा परिणाम म्हणून शिरोळे सलग दुसऱ्यांदा निवडून आले.

यावेळी आणखी लीड वाढला 

शिवाजीनगर मतदारसंघाच्या मतमोजणीमध्ये फारसे चढ-उतार झालेच नाहीत. जसे प्रचारात झाले, तसेच मतमोजणीतही झाले. सुरुवातीपासूनच महायुतीचे भाजपचे सिद्धार्थ शिरोळे आघाडीवर होते. काँग्रेसचे बंडखोर असलेले मनीष आनंद यांच्यामुळे काही फरक पडणे अपेक्षित होते. मात्र, तसेही काही झाले नाही. प्रत्येक फेरीत शिरोळे यांचे मताधिक्य वाढतच गेले. मनीष आनंद यांना एकूण फक्त १३ हजार २८ मते मिळाली, काँग्रेसचे दत्ता बहिरट यांना ४७ हजार ९९३ मते मिळाली, तर शिरोळे यांना ८४ हजार ६९५ मते पडली. तब्बल ३६ हजार ५७४ च्या लीडने शिरोळे निवडून आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिरोळे हे बहिरट यांच्याविरोधात ५ हजार मतांनी निवडून आले होते. यावेळी मात्र दत्ता बहिरट आणि अपक्ष उमेदवार असूनही शिरोळे यांचा लीड वाढला.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024shivajinagar-acशिवाजीनगरBJPभाजपाcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती