शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजीनगरमध्ये कोणाला धोबीपछाड

By admin | Updated: September 26, 2014 05:41 IST

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांच्या पक्षबदलाच्या चर्चेमुळे तसेच भाजपमध्ये सुरू

पुणे : लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण यांच्या पक्षबदलाच्या चर्चेमुळे तसेच भाजपमध्ये सुरू असलेल्या इच्छूक उमेदवारांच्या वादामुळे हा मतदारसंघ शहरातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला आहे. मात्र, आता निम्हण यांना कॉंग्रेसची उमेदवारी निश्चित झाली आहे. तर मनसेनेही राजू पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता भाजप-सेनेकडून कोण उमेदवार येणार आणि या मतदारसंघात कोणाला धोबीपछाड पडणार हा विषय चर्चेचा ठरला आहे. महायुती आणि आघाडी झाली नसल्याने या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे आमदार अनिल भोसले यांच्यासह शहर कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम यांनी आधीच प्रचाराला सुरूवात केलेली आहे. शिवसेनेकडून प्रशांत बधे, विलास सोनवणे यांच्या नावांचा विचार केला जाऊ शकतो. अन्यथा इतर पक्षातील नाराजालाही संधी मिळू शकते. भाजपला अंतर्गत वाद सोडवून या मतदारसंघात जम बसवावा लागणार आहे. या मतदारसंघात भाजपमध्ये इच्छुकांची रांग आहे. त्यात प्रामुख्याने खासदार अनिल शिरोळे यांचे चिरंजिव सिध्दार्थ शिरोळे, माजी शहराध्यक्ष विकास मठकरी, मुरलीधर मोहोळ, निलिमा खाडे इच्छूक आहेत. तर शिरोळे यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दोन गटातच शहकटशहाचे राजकारण सुरू आहे. त्यामुळे या पंचरंगी लढतीत कोण बाजी मारणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)