शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

शिवसृष्टी की मेट्रोचा तिढा सुटला

By admin | Updated: August 8, 2015 00:55 IST

जैवविविधता उद्यान (बीडीपी) मध्ये शासकीय तसेच महापालिकेच्या मालकीच्या जागेवर ४ टक्के बांधकाम करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने कोथरूड येथे

पुणे : जैवविविधता उद्यान (बीडीपी) मध्ये शासकीय तसेच महापालिकेच्या मालकीच्या जागेवर ४ टक्के बांधकाम करण्यास राज्य शासनाने परवानगी दिल्याने कोथरूड येथे होणाऱ्या शिवसृष्टी प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे. सुरुवातीला हा प्रकल्प कोथरूड कचरा डेपोच्या २७ एकर जागेवर उभारण्यात येणार होता. मात्र, याच ठिकाणी वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या पहिल्या डेपोसाठी ही जागा दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी)ने पुणे मेट्रोच्या अहवालात प्रस्तावित केल्याने या ठिकाणी मेट्रो होणार की शिवसृष्टी हा तिढा निर्माण झाला होता. मात्र, शासनाच्या या निर्णयाने दोन्ही प्रकल्प सुरळीत मार्गी लागण्याची चिन्हे असून शिवसृष्टीसाठी बीडीपीमधील ५० हेक्टर जागा उपलब्ध होणार आहे. महापालिकेच्या २००७ ते २०२७ च्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यात या जागेवर शिवसृष्टी अथवा मेट्रो असे कोणतेही आरक्षण न दर्शविता कल्चरल सेंटर (सीसी) असे दर्शविण्यात आले होते, तर या आरक्षणाबाबतचे नियम देताना, त्यात मेट्रो डेपोसाठीही या जागेचा वापर करणे शक्य असल्याचे नमूद केले होते. त्याच वेळी डीएमआरसी विकास आराखड्यात डेपोसाठी जागा दर्शविली नसल्याने मेट्रोला अडचणी होणार असल्याचे महापालिकेस कळविले होते. त्यामुळे मेट्रो होणार की शिवसृष्टी हा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, याच वेळी कचरा डेपो शेजारी असलेली बीडीपीमधील जागाही महापालिकेने शिवसृष्टीसाठी मागितली होती. त्यामुळे आता बीडीपीत शासकीय बांधकामास परवानगी असल्याने शिवसृष्टी बीडीपीच्या जागेत होणे शक्य आहे.शिवसृष्टी बीडीपीमध्ये होणार कचरा डेपोच्या जागेवरून वाद सुरू झाल्याने या प्रकरणी मध्यमार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मुख्य सभेत ठराव करून कोथरूड स. नं. ९९ आणि १०० या ठिकाणी झोन बदलून शिवसृष्टी प्रकल्प करण्याचा ठराव नगरनियोजन कायदा कलम ३७ अन्वये घ्यावा, तसेच त्यास मान्यता द्यावी, अशी मागणी केली होती. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता. या प्रस्तावानुसार, महापालिकेने शासनाकडे सुमारे १०० एकर जागेवर शिवसृष्टी उभारण्यासाठी सुचविले होते. दोन दिवसांपूर्वीच राज्य शासनाने बीडीपीचे आरक्षण कायम ठेवताना, तसेच खासगी बांधकामांना पूर्णपणे मनाई घालतानाच सरकारी किंवा मनपाच्या मालकीच्या जागेवर ४ टक्के बांधकाम करण्यास परवानगी, त्यात ऐतिहासिक संग्रहालय उभारणी, याला नगरनियोजन कायदा कलम ३१ अन्वये अंतिम मान्यता मिळाल्यामुळे आता बीडीपीच्या या निर्णयामुळे शिवसृष्टीचाही मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, ही जागा महापालिकेस तातडीने ताब्यात घ्यावी लागणार आहे.