शिवशक्ती परिक्रमा: पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे घेतले दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2023 17:56 IST2023-09-06T17:55:22+5:302023-09-06T17:56:39+5:30

कुलधर्म कुलाचारनुसार तळीभंडारचा विधी...

Shiv Shakti Parikrama: Pankaja Munde visited Khandoba at Jejuri Fort | शिवशक्ती परिक्रमा: पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे घेतले दर्शन

शिवशक्ती परिक्रमा: पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर खंडोबाचे घेतले दर्शन

जेजुरी (पुणे) : शिवशक्ती परिक्रमाअंतर्गत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडोबा देवाचे दर्शन घेतले. खंडोबा देवाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कुलधर्म कुलाचारनुसार तळी भंडारचा विधी केला.

श्री मार्तंड देवसंस्थानचे वतीने विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वास पानसे, अभिजित देवकाते यांनी पंकजा मुंडे यांचा खंडोबा देवाचा फोटो, घोंगडी व घुंगर काठी देऊन सन्मान केला. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा येळकोटचा जयघोष करून जेजुरी येथील शिवशक्ती परिक्रमा केली.

सध्या शासनाच्या वतीने पुरातत्त्व खात्याच्या वतीने मंदिराचे काम सुरू आहे. हे खूप महत्त्वाचे आहे, असे पंकजा मुंडे यांनी बोलताना सांगितले. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, भाजपचे बाबाराजे जाधवराव, वासुदेव काळे, दिलीप खैरे, श्रीकांत ताम्हाणे, जेजुरी शहर भाजपचे अध्यक्ष सचिन पेशवे, अलका शिंदे, गणेश भोसले, सचिन लांबते, साकेत जगताप तसेच हेमंत सोनवणे, पंकज निकुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Shiv Shakti Parikrama: Pankaja Munde visited Khandoba at Jejuri Fort