शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
4
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
5
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
6
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
7
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
8
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
9
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
10
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
11
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
12
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
13
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
14
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
15
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
16
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
17
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
18
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
19
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुखाच्या वडिलांचे निधन; हडपसर येथील सह्याद्री मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाची तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:45 IST

रुग्णालयाच्या डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप शिवसेनेच्या वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांनी केला आहे

पुणे : शिवसेनेचे वैद्यकीय कक्ष शहर प्रमुख अजय सपकाळ यांच्या वडिलांचं सह्याद्री रुग्णालयात निधन झाल्यानंतर या रुग्णालयाची तोडफोड करण्यात आली आहे. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असल्याने त्याचा राग मनात धरून माझ्या वडिलांना या लोकांनी शिक्षा दिल्याचा आरोप सपकाळ यांनी केला आहे. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असे म्हणत नातेवाईकांनी याठिकाणी आंदोलन सुरु केले आहे. 

अजय सपकाळ हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे वैद्यकीय कक्षाचे शहर प्रमुख आहेत. अजय सपकाळ यांच्या वडिलांचे 28 तारखेला साडेबारा वाजता अल्सरच ऑपरेशन होतं. त्यांनी सांगितले की, मी डॉक्टरांकडे माहिती घेऊन माझ्या वडिलांना रुग्णालयात ऍडमिट केलं होतं. दोन दिवसात व्यवस्थित होतील असं त्यांनी मला सांगितलं. 28 तारखेला ऑपरेशन झालं. त्यानंतर दोन दिवसात माझे वडील व्यवस्थित झाले. दोन दिवसात ते शुद्धीवर आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काढलेलं होतं. त्यांनी आमच्या सोबत गप्पा मारल्या. दोन दिवस ऑपरेशन झालेल्या माणसाला तेथील डॉक्टरांनी खुर्चीवर बसवलं आणि 20 ते 25 टाक्यांपैकी त्यांचे सहा-सात टाके त्यावेळेस तुटले. याबाबत डॉक्टरांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नाही. त्यांच्या शरीरात इन्फेक्शन झाल असल्याचं सांगितलं आणि स्कॅन करायला घेऊन गेले. 

अल्सरच ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या फुफुसात पाणी झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं नाही. फक्त इन्फेक्शन आहे इतकच सांगत राहिले. डॉक्टरांनी चुकीची ट्रीटमेंट देऊन माझ्या वडिलांना मारल्याचा आरोप अजय सपकाळ यांनी केला आहे. शिंदे साहेब मी तुम्हाला सांगत आहे मी शिवसेनेचा शहर प्रमुख असतानाही तुमच्या कार्यकर्त्याला हा न्याय मिळत असेल तर सर्वसामान्यांचे काय हाल असतील. तोडफोड कोणी केली याची आम्हाला कल्पना नाही. पण सर्वसामान्य माणसाला रोज या रुग्णालयाच मारण्याचे काम आहे. हे लोक इन्शुरन्स चे पैसे उकळतात आणि माणसं मारतात. जोपर्यंत हे रुग्णालय सील होत नाही आणि आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीत. मी वैद्यकीय क्षेत्रात काम करतो याचा राग मनात धरून त्याची शिक्षा माझ्या वडिलांना या लोकांनी दिली आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Shiv Sena Leader's Father Dies; Hospital Vandalized in Pune

Web Summary : Following the death of Shiv Sena's Ajay Sapkal's father at Sahyadri Hospital, the hospital was vandalized. Sapkal alleges medical negligence led to his father's death and demands the hospital's closure until justice is served. Relatives are protesting at the site.
टॅग्स :Puneपुणेhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरagitationआंदोलनShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणDeathमृत्यू