शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही, आघाडीबरोबर राहणार नाही, महादेव बाबर बंडखोरीच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 18:05 IST

पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही, आणि महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही

पुणे : पुण्याच्या हडपसर विधानसभेत महाविकास आघाडी कडून प्रशांत जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदार संघात ठाकरे गटाकडून महादेव बाबरही इच्छुक होते. हडपसरशिवसेना उद्धव ठाकरे गटाला देण्याची त्यांनी मागणीही केली होती. मात्र तो शरद पवार गटाकडे गेल्याने बाबर यांनी नाराजी व्यक्त केली आहे.  शिवसेनेचं काम इथून पुढं करणार नाही. तसेच आघाडीबरोबरही राहणार नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

बाबर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील २१ जागांवर शिवसेनेनं एकही उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे माझ्यासहित अनेक नेते पक्षावर नाराज आहेत. आताही हडपसरमध्ये शिवसेनेचा उमेदवार दिला नाही. शिवसेनेकडून जिंकण्याची तयारी झाली आहे. आता मात्र माझी स्पष्ट भूमिका सांगतो की, पदाधिकाऱ्यांचा म्हणणं काय? यावर आम्ही निर्णय घेणार आहोत. शिवसेना पुढे जावी यावर आम्ही ठाम आहोत. पण पक्ष प्रमुखांना आमचा विचार करायचा नसेल. तर शिवसेनेचे काम इथून पुढं करणार नाही. काही झालं तरी आता महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही. आम्ही मातोश्रीला साहेबांना भेटायला गेल्यावर सकाळी ११ ते ५ बसून होतो. उद्धव साहेब आले ४० सेकंड आम्हाला भेटले आणि निघून गेले. माझा पुढचा निर्णय कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना विचारून घेणार. आघाडीतील कुठल्याही शहाण्याने मला समजावण्याचा प्रयत्न  करू नये. 

२००९ साली हडपसर मतदारसंघाची निर्मिती झाली. त्यानंतर २००९ साली युती आणि आघाडी यांच्यात निवडणूक झाली. यामध्ये शिवसेनेचे महादेव बाबर यांना ६५ हजार ५१७, तर शिवरकर यांना ५५ हजार २०८ मते मिळाली होती. बाबर यांना २ हजार ०१८ मतांनी निवडून आले होते. २०१९ मध्ये चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून तर शिवसेना-भाजप युतीकडून योगेश टिळेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यामध्ये चेतन विठ्ठल तुपे यांना ९२ हजार ३२६ तर योगेश टिळेकर यांना ८९ हजार ५०६ एवढी मते मिळाली होती. या निवडणुकीत केवळ २ हजार ८२० च्या फरकाने चेतन तुपे निवडून आले होते. २०१४ ची निवडणूक ही प्रत्येक पक्षाने स्वतंत्रपणे लढवली होती. यामध्ये ती भाजपकडून योगेश टिळेकर यांना ८२ हजार ६२९ तर शिवसेनेकडून महादेव बाबर यांना ५२ हजार ३८१ राष्ट्रवादीकडून चेतन तुपे यांना २९ हजार ९४७ तर काँग्रेसचे बाळासाहेब शिवरकर यांना २२ हजार १०० , प्रमोद भानगिरे यांना २५ हजार २०८ मते मिळाली होती. त्यावेळी भाजपाच्या लाटेत ३० हजार मतांनी योगेश टिळेकर विजयी झाले होते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४hadapsar-acहडपसरMahadev Babarमहादेव बाबरShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार