शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचा बहिष्कार !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 4:07 PM

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे.

पुणे :  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या पुण्यात होणाऱ्या कार्यक्रमावर शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बहिष्कार टाकला आहे. या तीनही पक्षांनी वेगवेगळी कारणे देत कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दुसरीकडे भाजपने मात्र हा प्रकार केविलवाणा असल्याचे सांगून दुर्लक्ष केले आहे.                   याबाबत अधिक माहिती अशी की, थोड्याच वेळात हिंजवडी ते शिवाजीनगर या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या (पीएमआरडीए)  देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील मेट्रो लाईन - ३चा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे .या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमावर पुण्यातील विरोधकांनी बहिष्कार टाकल्याचे बघायला मिळत आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष चेतन यांनी हा कार्यक्रम भाजपच्या प्रचाराचा आहे असा आरोप केला आहे. महिलांना सन्मान  भाषा करणाऱ्या भाजपने खासदार सुप्रिया सुळे व वंदना चव्हाण यांना या कार्यक्रमात सन्मानाची वागणूक दिली नसल्याचे कारण त्यांनी दिले आहे. 

                  काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे म्हणाले की, महापालिकेच्या मंजुरीआधी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. अखेर सत्ताधाऱ्यांनी संख्याबळाच्या आधारावर चर्चा न करता मुख्यसभेत मेट्रोचा विषय मान्य करण्यात आल्याचे म्हटले. सगळ्यात आश्चर्य म्हणजे राज्यात भाजपला सळो की पळो करून सोडणाऱ्या शिवसेनेने मात्र भाजपच्या महापौर मुक्ता टिळक यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेवर नसल्याच्या कारणावरून कार्यक्रमाला जाण्यास नकार दर्शवला आहे. शिवसेनेचे गटनेते संजय भोसले म्हणाले की, नियमानुसार महापौरांचे निमंत्रण पत्रिकेत नाव असणे आवश्यक असून हा पुणेकरांचा अपमान आहे. भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहे.सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी विरोधकांकडे मुद्दे नसल्याने हा प्रकार सुरु असल्याचे म्हटले. 

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसPoliticsराजकारण