शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

शिवसेना ठाकरे यांचीच; भाजपत आलेल्या नगरसेवकांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 16:49 IST

भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला.

- राजू इनामदारपुणे : व्यक्तीकेंद्रीत पक्ष असलेली शिवसेना की राष्ट्रकेंद्रीत असलेला भारतीय जनता पक्ष यामध्ये आम्ही राष्ट्रकेंद्रीत पक्षाची निवड केली असे स्पष्ट करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या उद्धवसेनेच्या ५ माजी नगरसेवकांनी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे सांगितले. महापालिका उमेदवारीबाबत पक्षाचा आदेश मान्य करू असे ते म्हणाले.

उद्धव सेनेतील विशाल धनवडे, बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, संगीता ठोसर व प्राची आल्हाट या ५ माजी नगरसेवकांनी नुकताच भाजपत प्रवेश केला. त्यानंतर भाजप कार्यालयात झालेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. पक्षाचे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, पुष्कर तुळजापूरकर, मंदार बलकवडे, राजाभाऊ शेंडगे यावेळी उपस्थित होते.

आमच्या पूर्वीच्या पक्षावर आम्ही कधीच टीका करणार नाही, मात्र त्यांची भूमिका पटली नाही, त्यामुळे पक्षबदल केला असे या नगरसेवकांनी स्पष्ट केले. बाळा ओसवाल म्हणाले, २५ वर्षे आम्ही शिवसेनेत होतो. हिंदुत्वाविषयी मी प्रथमपासून आग्रही आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेसबरोबर युती केली त्यावेळीच आम्हाला पटले नव्हते. त्यातच दररोज सकाळी वाजणाऱ्या भोंग्यामुळे पक्षाबद्दलची नकारात्मकता वाढतच गेली. पुण्यात पक्षवाढीकडे मुंबईतील नेत्यांचे दुर्लक्ष झाले. आम्ही वारंवार त्यांना सांगत होतो, मात्र त्याकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. अखेर हा निर्णय घ्यावा लागला. धनवडे यांनीही यावेळी हेच सांगितले. शिवसेनेत असलो तरी भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यापासूनच राजकारणाचे धडे घेतले. त्यामुळे भाजप हा काही आमच्यासाठी नवा पक्ष नाही असे ते म्हणाले.

हिंदुत्वासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पर्याय का निवडला नाही यावर बोलताना ओसवाल व धनवडे यांनी व्यक्तीकेंद्रीत पक्ष की राष्ट्रकेंद्रीत पक्ष यात आम्ही भाजपची निवड केली असे सांगितले. भाजपचा नारा राष्ट्र प्रथम असा आहे, आता महापालिकेची उमेदवारी मिळाली नाही तर मग काय करणार? या प्रश्नावर या ५ नगरसेवकांनी आम्ही पक्षादेश प्रमाण मानणारेच आहोत, शिवसेनेत होतो त्यावेळीही तेच केले व आताही तेच करू असे सांगितले.

भाजपच्या मुळ कार्यकर्त्यांमध्ये या पक्षप्रवेशामुळे नाराजी आहे याकडे लक्ष वेधल्यानंतर सरचिटणीस पुनीत जोशी यांनी मोठ्या पक्षात अशा लहानलहान गोष्टी होतच असतात, त्यामुळे काही फरक पडणार नाही असे उत्तर दिले. पक्षाच्या वरिष्ठ स्तराने हा निर्णय घेतला, पक्ष कार्यकर्ते म्हणून आम्ही त्या निर्णयाबरोबर आहोत असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे