युतीच्या गोंधळात शिवसंग्रामचा विसर ; विनायक मेटेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 13:49 IST2019-09-23T13:45:48+5:302019-09-23T13:49:28+5:30
भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीच्या जागांवर चर्चा सुरु असताना त्यांना शिवसंग्राम आणि अन्य मित्रपक्षांचा विसर पडल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत विनायक मेटे यांनी पुण्यात पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. सध्या ही घोले रोड येथे बैठक सुरु झाली आहे.

युतीच्या गोंधळात शिवसंग्रामचा विसर ; विनायक मेटेंनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक
पुणे : भाजप आणि शिवसेना यांच्यात युतीच्या जागांवर चर्चा सुरु असताना त्यांना शिवसंग्राम आणि अन्य मित्रपक्षांचा विसर पडल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत विनायक मेटे यांनी पुण्यात पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. सध्या ही घोले रोड येथे बैठक सुरु झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सदाभाऊ खोत, महादेव जानकर आणि विनायक मेटे आपल्या पक्षांसह मागील पाच वर्षांपासून युतीत सहभागी आहेत. त्यांना स्वतःला वगळता मिळालेली पदे सोडून कोणत्याही कार्यकर्त्याला लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली नाही. काही कार्यकर्त्यांना राज्य सरकारच्या महामंडळांवर स्थान देण्यात आले मात्र ठोस असे काहीही या पक्षांसाठी मागील पाच वर्षात घडले नाही. त्यामुळेच की काय कार्यकर्त्यांमध्ये काहीसे संभ्रमित वातावरण आहे. त्यामुळेच कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी मेटे यांनी बैठक बोलावली आहे.
आता या बैठकीत कोणती दिशा ठरते आणि युतीमध्ये त्यांचा पक्ष किती जागा मागतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या शिवसंग्राम पक्षात काही कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे समजते.