शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

सर्वाधिक खर्च करुनही झगडावे लागले ‘सुळें ’ ना, कमी खर्चात सर्वाधिक मताधिक्य मिळाले ‘शिरोळें ’ना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 08, 2019 11:42 AM

सर्वात कमी मताधिक्यांनी विजयी झालेल्या सुप्रिया सुळे या निवडणुकीत खर्च करण्यामध्ये देशात सहाव्या क्रमांकावर होत्या़. 

ठळक मुद्दे अनिल शिरोळें चा निवडणुकीत खर्च करणाऱ्या खासदारांमध्ये देशात ३४२ वा क्रमांक

-विवेक भुसे- पुणे : निवडणुकांचा खर्च वाढत असल्याचे सांगितले जात असले तरी निवडणुक आयोगाला सादर करण्यात येणाऱ्या खर्चामध्ये मात्र त्याचे प्रतिबिंब दिसून येत नाही़. गेल्या लोकसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक ३ लाख १५ हजार मतांनी पुण्यातून अनिल शिरोळे विजयी झाले होते़. त्यात त्यांनी सर्वात कमी खर्च केला होता़ .तर सर्वात कमी मताधिक्यांनी विजयी झालेल्या सुप्रिया सुळे या निवडणुकीत खर्च करण्यामध्ये देशात सहाव्या क्रमांकावर होत्या़. निवडणुका झाल्यानंतर पुढील ३० दिवसात उमेदवारांना त्यांनी केलेल्या खर्चाची माहिती निवडणुक आयोगाला द्यावा लागतो़. उमेदवारांना निवडणुकीत खर्च करण्यासाठी ७० लाख रुपयांची मर्यादा घालण्यात आली आहे़ त्यापेक्षा कितीतरी अधिक खर्च प्रत्यक्षात केला जात असल्याचे सांगितले जाते़. मात्र, पुणे जिल्ह्यातील चारही खासदारांनी आपला खर्च त्यावेळी दिला होता़. त्यात सर्वाधिक खर्च बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ६४ लाख २९ हजार ४०९ रुपये खर्च केला होता़. हा देशभरातील ५३७ खासदारांमध्ये सहाव्या क्रमांकाचा खर्च होता़. त्याखालोखाल शिरुरचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ५४ लाख १५ हजार ८८ रुपये खर्च केला होता़ त्यांचा खर्च करण्यामध्ये देशात ८२ वा क्रमांक लागतो़ तर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ४२ लाख ९४ हजार ५२४ रुपये खर्च दाखविला होता़, त्यांचा देशात २४२ वा क्रमांक लागतो़. पुण्यातील अनिल शिरोळे यांनी सर्वाधिक मतांनी विजय मिळविला तरी खर्चामध्ये मात्र ते खूप मागे होते़. देशात खर्च करणाऱ्या खासदारांमध्ये ३४२ वा क्रमांक लागतो़. त्यांनी ३६ लाख ३४ हजार १०८ रुपये खर्च केला होता़. अनिल शिरोळे यांच्यासाठी तत्कालीन पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा झाली होती़. मात्र, स्टार प्रचारकाच्या जाहीर सभेसाठी केवळ ७ लाख २ हजार १२५ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे़. त्यांनी कार्यकर्त्यांवर ७ लाख २९ हजार रुपये खर्च दाखविला होता़ तर प्रचार साहित्यासाठी ७ लाख २६ हजार रुपये खर्च केले होते़. सुप्रिया सुळे यांचा सर्वाधिक १९ लाख २१ हजार रुपये खर्च जाहीर सभांवर झाला तर स्टार प्रचारकांसमवेतचा खर्चही १६ लाख रुपये झाला होता़. श्रीरंग बारणे यांनी जाहीर सभांवर २२ लाख ४३ हजार रुपये तर स्टार प्रचारकांसमवेतचा जाहीर सभांचा खर्च सर्वाधिक २१ लाख ५७ हजार रुपये केला होता़. एका नेत्यांच्या सभेसाठी गावागावांहून अगदी जीप, बसगाड्या भरुन लोक येतात़. प्रत्यक्षात ते आणले जातात, हे उघड सत्य आहे़. मात्र, कागदोपत्री हा खर्च कोठेच दाखविला जात नाही़. त्याचवेळी आम्ही पारदर्शक कारभार करु अशी आश्वासने दिली जात असतात़. ़़़़़़़़़़२०१४ च्या निवडणुकीत केलेला खासदारांनी खर्चसुप्रिया सुळे        ६४ लाख २९ हजार ४०९शिवाजीराव आढळराव    ५४ लाख १५ हजार ८८श्रीरंग बारणे        ४२ लाख ७९ हजार १५० अनिल शिरोळे        ३६ लाख ५४ हजार ११ 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSupriya Suleसुप्रिया सुळेanil shiroleअनिल शिरोळे