शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

लॉकडाऊनमध्ये वारजेतील ‘ती’ महिला थेट पोहचली ‘आसाम’मध्ये; पोलिसांनी आणले सुखरुप परत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 10:08 PM

महिलेला ताब्यात घेतल्यावर तिने सांगितलेले कारण ऐकून पोलीसही झाले हैराण..

ठळक मुद्देपुण्याहून चारचाकीने इतक्या लांब ही महिला गेलीच कशी असा प्रश्न उपस्थित

पुणे : घरात झालेल्या भांडणातून तिने डोक्यात राग घालून घेतला. आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर ती घरातून बाहेर पडली. घरातील लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली. तिचे मोबाईल लोकेशन घेतले तर ती आसामामध्ये असल्याचे आढळून आले. ३० वर्षांची महिला सोबत लहान मुलगा तसेच देशाच्या सीमेवरच्या जिल्ह्यात आढळल्याने लॉकडाऊनमध्ये ही महिला इतके लांब गेलीच कशी असा प्रश्न पोलिसांना पडला. सामाजिक सुरक्षा विभागाने तातडीने एक पथक आसामाला पाठविले. करीमगंज पोलीस ठाण्याशी संपर्क साधून या महिलेला ताब्यात घेऊन पुण्यात आणले. तेव्हा तिने सांगितलेले कारण ऐकून पोलीसही हैराण झाले.

वारजे येथील ही ३० वर्षांची महिला पुण्यातच राहणारी. ती नोकरी करते. तिचा पतीही नोकरी करतो. घरात भांडण झाले. घरातील कोणी आपले ऐकत नाही़ हे पाहून ही महिला आपल्या ३ वर्षाच्या मुलाला घेऊन घरातून निघून गेली. वारजे पोलीस ठाण्यात हरविल्याची तक्रार ८ जून रोजी दाखल करण्यात आली होती. सामाजिक सुरक्षा विभागाने या महिलेचा शोध सुरु केला. तेव्हा तिच्या मोबाईलचे लोकेशन आसाममधील करीमगंज सिलचर रोड येथे आढळून आले. पुणे पोलिसांनी तातडीने करीमगंज पोलिसांना याची माहिती कळविली. तेथील पोलिसांनी या महिलेचा शोध घेऊन मुलासह तिला १४ जूनला ताब्यात घेतले. ती म्हणाली, भांडणामुळे राग आल्याने मी बाहेर पडले होते. राग शांत झाल्यावर घरी परत येणारच होते.ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके, पोलीस शिपाई भांडवलकर हे तातडीने आसामला गेले. त्यांनी या महिलेला मुलासह ताब्यात घेऊन पुण्यात आणले व नातेवाईकांच्या ताब्यात दिले.

देशभर लॉकडाऊन सुरु आहे. अशा परिस्थितीत पुण्याहून चारचाकीने इतक्या लांब ही महिला गेलीच कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तिला वाटेत कोणीही अडविले नाही का?. तिच्याबरोबर आलेली व्यक्ती कोठे गेली़ असे अनेक प्रश्न निर्माण झाले. तिची मानसिक स्थिती चांगली नसल्याने याबाबत चौकशी करता आली नाही. इतक्या लांब गेल्यानंतरही तिला सुखरुप परत घरी आणता आले, हे अधिक महत्वाचे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी चांदगुडे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेWarje Malwadiवारजे माळवाडीAssamआसामPoliceपोलिसWomenमहिलाFamilyपरिवार