शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

मृत वडिलांच्या अधुऱ्या स्वप्नासाठी ‘तिने’ चढवली खाकी वर्दी अंगावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 18:33 IST

वडिलांनी भारतीय सैन्य दलामार्फत देशसेवेचे व्रत एकनिष्ठतेने जपले..त्यांनी धाकट्या मुलीत देशसेवेचे स्वप्न पाहिले ..

ठळक मुद्देअनुसूचित जाती प्रवगार्तून राज्यात मिळवला प्रथम क्रमांक 

पुणे : वडिलांनी भारतीय सैन्य दलामार्फत देशसेवेचे व्रत एकनिष्ठतेने जपले..तेथून निवृत्त झाल्यावरही सामाजिक बांधिलकीतून अनेकांच्या रेशीम गाठी जुळवत असंख्य संसार फुलवले. परमेश्वराने त्यांच्या पदरात दिलं तीन मुलींचं दान...पण धाकट्या मुलीत त्यांनी स्वत: स्विकारलेल्या देशसेवेचे स्वप्न पाहिले ..असे हे श्रीकांत गायकवाड.. परंतु, त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण कुटुंबावर आभाळ कोसळले.. या अडचणींना कणखरपणे सामोरे गेले.. या दिवसांमध्येही तिने दिवस रात्र मेहनत घेत राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिराक्षक परीक्षेत अनुसुचित जाती प्रवर्गातून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला....या यशस्वी तेजशलाकाचे नाव आहे पूजा गायकवाड.. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा श्रीकांत गायकवाड (रा.टिंगरेनगर, पुणे (मूळ- कुंपरवळण, ता.पुरंदर )चे सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होऊन एमएससी बायोटेक झाले आहे. तिला दोन मोठ्या बहिणी असून, एकीचे लग्न झाले आहे. पूजा ही लहानपणापासून आभ्यासात हुशार होती. तिच्यात अधिकारी होण्याची क्षमता आहे हे तिच्या वडिलांनी ओळखले होते. परंतु, वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने पीएसआय होण्याचा सल्ला पूजाला दिला, आईच्या मिळालेल्या पाठबळामुळेच पूजाला पोलीस उपनिरीक्षक होता आले. तिच्या या उत्तुंग भरारी मुळे सर्वांनी तिचे भरभरून कौतुकास्पद अभिनंदन केले आहे. ..........................वडिलांची अधुरी इच्छा पूर्ण करण्यासाठी मी आज आईच्या पाठबळावर पोलीस दलात अधिकारी झाले आहे, परंतु, आज ते पाहण्यासाठी वडील हयात नाहीत, याचे फार मोठे दुख: मनात व्याकुळ होऊन बसले आहे.  पूढे उपविभागीय पोलीस अधिकारी होऊन पीडितांना  ख्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पूजाने लोकमत शी बोलतांना सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाWomenमहिला