शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

‘तिने’ मिळविले ९२ टक्के

By admin | Updated: June 12, 2015 06:01 IST

डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील आशा साळुंके हिने दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. घरी अठरा विश्वं दारिद्र्य, आई मूकबधीर, वडील

डोर्लेवाडी : डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील आशा साळुंके हिने दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. घरी अठरा विश्वं दारिद्र्य, आई मूकबधीर, वडील व बहीण मतिमंद. वयाची ऐंशी वर्षं पूर्ण केलेल्या आजोबांनी दुधाचा धंदा करून शिक्षणासाठी साथ दिली. तिने तेवढ्याच जिद्धीने अभ्यास केला. डोर्लेवाडी (ता. बारामती) केंद्रात ९२ टक्के गुण मिळवून पहिला येण्याचा मान येथील आशा ज्ञानदेव साळुंके या विद्यार्थिनीने मिळविला आहे. आशाची आई जन्मजात मूकबधिर, तर वडील व मोठी बहीणही मतिमंद आहेत. ८० च्या पुढे गेलेल्या वयोवृद्ध आजोबा केरबा साळुंके यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट करून दुधाच्या रतिबावर घर प्रपंच चालविला.मात्र, आशा हिची लहानपणा पासूनच शिक्षणात असलेली हुशारी पाहून अडाणी असणाऱ्या तिच्या आजोबांनी शिक्षणासाठी पडेल ते कष्ट करण्याची तयारी ठेवली. सकाळी लवकर उठून गुरांच्या धारा काढणे. चारा पाणीकरणे, आजोबांना बरोबर घेऊन बारामती येथे अनेक घरी रतीबाचे दूध देणे असा दिनक्रम सुरू होता. त्यामुळे मिळेल त्या वेळेत अभ्यास करणे तिने सोडले नाही. घरी अभ्यासासाठी अनुकूल कौटुंबिक वातावरण नसल्यामुळे पहाटे व रात्री अगदी घराच्या छतावर देखील तिने अभ्यास केला आहे. केंद्रात पहिला क्रमांक आल्याची बातमी मिळाल्यानंतर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. शेजारच्या मुलींनी सांगितल्यानंतर तिचे आई, वडील व आजी आजोबांच्याही डोळ्यातून आनंदाने अश्रूंच्या धारा वाहत होत्या... तिच्यावर कालपासून गावातील ग्रामस्थ व शिक्षकांकडून कौतुकाचा वर्षाव होत होता. अनेकांनी घरी जाऊन तिचे अभिनंदन केले. (वार्ताहर)