शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

शरीरावर तीक्ष्ण हत्याराचे वार, डोक्यात दांडक्याचा प्रहार; सतीश वाघ खून प्रकरणात काय काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 14:11 IST

सतीश वाघ हे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते

किरण शिंदे

पुणे  - भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ (वय ५५) यांचे मंगळवारी पहाटे अपहरण करून खून करण्यात आला. यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदवणे घाटात मंगळवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला. या घटनेला आतापर्यंत २४ तास उलटून गेले. मात्र अद्यापही पोलिसांच्या हाती ठोस माहिती लागली नाही. 

सतीश वाघ हे हडपसर भागातील मांजरी फार्म परिसरात वास्तव्यास होते. हडपसर परिसरात त्यांचा नावलौकिक होता. विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे ते सख्खे मामा होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक करण्यासाठी घराबाहेर पडले होते. घरापासून काही अंतरावर जातात चौघांनी त्यांना जबरदस्तीने चार चाकी वाहनात बसवले. त्यानंतर त्यांचे अपहरण करून घेऊन गेले. दरम्यान सतीश वाघ यांना गाडीत डांबून येत असताना एका नागरिकांनी हा संपूर्ण प्रकार पाहिला आणि वाघ यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली. 

वाघ कुटुंबीयांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत असताना मंगळवारी सायंकाळी शिदवणे घाटातसतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. शिंदवणे घाटातून काही नागरिक जात असताना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह त्यांना दिसला. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

सतीश वाघ यांच्या संपूर्ण अंगावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची दिसून आले. याशिवाय मृतदेहाजवळ लाकडी दांडके ही होते. या दांडक्याने वाघ यांच्या डोक्यावर वार करण्यात आले. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात टाकून आरोपी पसार झाले. अपहरण केल्यानंतर काही तासातच आरोपींनी सतीश वाघ यांचा खून केला असण्याची शक्यता आहे. पोलिसांची १६ पथके या गुन्ह्याच्या तपासासाठी कामाला लागले आहेत. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून पुरावे गोळा करण्याचे काम पोलिसकडून सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रCrime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसCourtन्यायालय