Sharad Pawar's phone rang with a touch of humanity; It boosted the confidence of the family including the female doctor | शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास

शरद पवारांचा माणुसकीचा फोन अन् कोरोनाबाधित महिला डॉक्टरसह कुटुंबियांना मिळाला आत्मविश्वास

ठळक मुद्देकोरोनाबाधित महिला डॉक्टरवर सुरू आहे वायसीएममध्ये उपचार

पिंपरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वयाच्या ८१ वर्षीही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार महाराष्ट्राचा दौरा करून कोरानाग्रस्तांच्या कुटुंबियांना धीर देत आहेत. पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात उपचार घेत असलेल्या डॉ. आरती उदगीरकर यांची विचारपूस पवार यांनी केली आहे. त्यामुळे कोरोनासाठी काम करणाऱ्या कोविड योद्धयांचा आत्मविश्वास वाढला आहे.  
पिंपरी-चिंचवड शहरातील यशवंतराव चव्हाण रूग्णालयात डॉ. आरती उदगीरकर उपचार घेत आहे. कोरानाने हिरावली बहिण भावाची भेट असे वृत्त सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर याची दखल शरद पवार यांनी घेतली आहे. पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संपर्क साधून विचारपूस केली.
शरद पवार म्हणाले, ‘‘वायसीएमच्या डॉक्टरांबरोबर माझे बोलणे झाले आहे. डॉ. आरती यांना विश्रांती घ्यावी, लागेल. उपचारासाठी दोन तीन आठवडे लागतील. काळजी करण्याचे काहीही कारण नाही. धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाडही उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत. जोमाने कामास लागले आहेत.’’
डॉ. आरती उदगीरकर म्हणाल्या, ‘‘माझी विचारपूस जेष्ठ नेते करतील, याबाबत मला कल्पना नव्हती. माझी आस्थेने चौकशी केली. पवार यांच्या फोननंतर आयुक्त श्रावण हर्डीकर, अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे, डॉ. अनिकेत लाठी, डॉ. एम. एस कराळे या डॉक्टरांनीही माझी विचारपूस केली. मनोबल वाढविण्याचे काम केले.’’
आरतीचे बंधू उमेश उदगीकर म्हणाले, ‘‘वयाच्या ८१ शरद पवार हे तरूणाप्रमाणे काम करीत आहेत. त्यांच्या फोननंतर कुटुंबाला मानसिक बळ मिळाले आहे.’’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Sharad Pawar's phone rang with a touch of humanity; It boosted the confidence of the family including the female doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.