शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

"पुण्यात आता चंद्रावर जाण्याचा उद्योग होतोय", शरद पवारांचा महायुतीला खोचक टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 17:50 IST

Sharad Pawar About Pune : पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अंमली पदार्थांच्या सेवनाच्या प्रकाराबद्दल शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्याची ओळख आताच्या राजकर्त्यांनी कोयता गँग अशी करून टाकली आहे, असे शरद पवार म्हणाले. 

Sharad Pawar Pune : पुणे शहर आणि परिसरात कोयता गँगची दहशत वाढल्याचे चित्र आहे. कोयत्याने हल्ले केल्याच्या अनेक घटना शहरात सतत घडत असतात. त्याचबरोबर ड्रग्ज प्रकरणानेही खळबळ माजली होती. या दोन्ही मुद्द्यांवरून शरद पवारांनीमहायुती सरकारला घेरले. खराडी येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना शरद पवारांनीमहायुती सरकारचा उपरोधिक शब्दात समाचार घेतला. 

शरद पवार म्हणाले, "आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी पुण्यामध्ये काय केलं? मी देशाच्या कामासाठी  दिल्लीला जातो, पार्लमेंटचा सभासद आहे म्हणून दिल्लीला जातो. महाराष्ट्राची  वर्तमानपत्र मागून घेतो. टीव्ही लावतो, काय बघायला मिळतं? पुण्याची चौकशी  केली तर लोक सांगतात पुण्याचे वैशिष्ट्य काय? कोयता गँग. कोयता गँग विद्येचे माहेरघर हे पुणे."

राजकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य कोयता गँग केले -शरद पवार 

"टेल्को सारखा कारखाना, या पुण्यात बजाज सारखा कारखाना हे पुण्याचे वैशिष्ट्य आहे. किर्लोस्करांचे कारखाने हे पुण्याचे वैशिष्ट्य आणि आजच्या राज्यकर्त्यांनी पुण्याचे वैशिष्ट्य काय केले? कोयता गँग", असे म्हणत शरद पवारांनी पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरून महायुती सरकारला लक्ष्य केले. 

"आता भाषणामध्ये कोणी सांगितलं. अलीकडच्या काळामध्ये नवी पिढी काय करते मला माहित नाही. कसल्या तरी गोळ्या असतात, ते खाल्लं तर एकदम चंद्रावर जातो आणि ते चंद्रावर जाण्याचा उद्योग आज पुण्याच्या भागांमध्ये व्हायला  लागला आहे", असे म्हणत शरद पवारांनी अमली पदार्थांच्या वाढत्या व्यसनाधितेवरून सरकारवर निशाणा साधला.

"कोयता गँग, ड्रग्ज व्यवहाराचा राजकर्त्यांकडून विस्तार"

"आजचे राज्यकर्ते कोयता गँग असो, ड्रग्ज व्यवहार असो याचा विस्तार पुणे आणि पुण्याच्या आजूबाजूला करत आहेत. यामुळे पुणे आणि पुण्याची नवी पिढी ही उद्ध्वस्त होणार, या प्रकारचे चित्र या ठिकाणी दिसते. आज हा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्राचा  चेहरा आम्हाला बदलायचा आहे. आता शिंदे साहेबांचं राज्य आहे. त्याच्या आधी  देवेंद्र फडणवीसांच राज्य होतं. काय केलं यांच्या राजवटीत? मी स्वतः तुम्हा  लोकांच्या पाठिंब्याने चार वेळा राज्याचा मुख्यमंत्री होतो. आमचे अनेक  सहकारी मंत्रिमंडळात होते. सत्तेचा वापर राज्याचा चेहरा बदलण्यासाठी करायचा  असतो हे आम्ही दाखवलं", असे शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस