महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार, राज्यात आमचेच सरकार असेल : शरद पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2024 19:24 IST2024-06-13T19:23:59+5:302024-06-13T19:24:37+5:30
येत्या चार महिन्यांमध्ये महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला जाईल. तसेच राज्यातील सत्ता खेचून आणली जाईल असेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले...

महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढणार, राज्यात आमचेच सरकार असेल : शरद पवार
भांडगाव (पुणे) : दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न लवकरच सोडवला जाईल. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वसामान्य मतदारांनी महत्त्वाचे योगदान दिले. येत्या चार महिन्यांमध्ये महाराष्ट्राचा कानाकोपरा पिंजून काढला जाईल. तसेच राज्यातील सत्ता खेचून आणली जाईल असेही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
दौंड तालुक्यातील मतदारांचे आभार मानण्यासाठी तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी शरद पवार यांनी दुष्काळी गावांचा दौरा केला. यावेळी दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने जगन्नाथ शेवाळे, आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, रामभाऊ टुले, सरपंच वैशाली अडसूळ, अशोक शिंदे, मोहन चौधरी, विकास चौधरी, योगेश शिंदे, समीर डोंबे, सुहास चौधरी, शिवाजी पिसे, मधुकर चव्हाण, प्रकाश चौधरी, बाळासो डोंबे आणि मोठ्या प्रमाणावर खोर ग्रामस्थ उपस्थित होते.
खोर येथील नागरिकांशी संवाद साधताना पवार म्हणाले, दुधाला आणि कांद्याला दर मिळण्यासाठी लवकरच राज्यव्यापी आंदोलन केले जाणार आहे. ज्या पद्धतीने लोकसभेला खोरमधील मतदारांनी सहकार्य केले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेमध्येही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.