शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील २ मतदारसंघात अजित पवार गटाविरुद्ध शरद पवार गट; कोणाचं पारडं जड? निर्णय मतदारांचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 15:45 IST

वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी तर पर्वती आणि खडकवासला राष्ट्रवादी शरद पवार गट विरुद्ध भाजप असा सामना

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचा अजित पवार गट आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची राष्ट्रवादी यंदा प्रथमच विधानसभा निवडणुकीत समोरासमोर उभी ठाकली आहे. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट दोन जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष चार जागा लढत आहे. शहरातील वडगावशेरी मतदारसंघ आणि हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे वडगावशेरी आणि हडपसरमध्ये राष्ट्रवादी विरूद्ध राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे. पर्वती आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत पुण्यात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाची अस्तित्त्वाची लढाई आहे.

वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बापू पठारे उभे आहेत. हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार चेतन तुपे यांच्या विरोधात शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप उभे आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अश्विनी कदम यांच्यात, तर खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजपचे भीमराव तापकीर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सचिन दोडके यांच्या लढत होणार आहे. वडगाव शेरी मतदार संघातून सुनील टिंगरे २०१९ साली निवडून आले होते. त्याठिकाणी बापू पठारे शरद पवार गटाकडून निवडणूक लढवणार आहेत. बापू पठारे २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ३० ते ४० हजारांच्या फरकाने निवडून आले होते. तर २०१४ ला तिसऱ्या नंबरवर राहून पराभूत झाले होते. २०१९  मात्र त्यांनी निवडणूक लढवली नाही. तेव्हा टिंगरे राष्ट्रवादीकडून विजयी झाले होते. वडगाव शेरी या मतदारसंघात राष्ट्रवादीचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर असल्याचे मागील निवडणूका बघून लक्षात येते. 

हडपसर विधानसभा मतदार संघातून २०१९ च्या निवडणुकीत तुपेंनी राष्ट्रवादीकडून विजय मिळवला होता. तर त्यांच्या समोर आव्हान देणाऱ्या प्रशांत जगतापांनी हडपसरमधून एकदाही निवडणूक लढवली नाही. पण २०१४ च्या निवडणुकीत ४० हजारांच्या आसपास अशा मोठ्या फरकाने तुपेंचा पराभव झाला होता. तेव्हा भाजपकडून योगेश टिळेकर निवडून आले होते. हा मतदार संघ एकाच पक्षाचा न राहिल्याने येत्या विधानसभेत मतदार कोणाला संधी देणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. 

पर्वती विधानसभा मतदार संघातून माधुरी मिसाळ ३ वेळा निवडून आल्या होत्या. त्यांना आव्हान देणाऱ्या अश्विनी कदम या २०१९ च्या निवडणुकीत मिसाळ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीकडून लढल्या होत्या. त्यावेळी ३० हजारांच्या फरकाने कदम यांचा पराभव झाला होता. पर्वती विधानसभा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला पर्वतीवर विजय मिळवणे हे आव्हानात्मक असल्याचे दिसत आहे. 

खडकवासला विधानसभेतून तर अवघ्या २ हजार मतांनी तापकीर यांनी दोडगे यांचा पराभव केला होता. आता दोघांनाही खडकवासल्यातून जोर लावावा लागणार आहे. याठिकाणी मयुरेश वांजळे रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे हि तिरंगी लढत होणार असून खडकवासल्यातील नागरिक कोणाला साथ देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.        

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parvati-acपर्वतीkhadakwasala-acखडकवासलाhadapsar-acहडपसरvadgaon-sheri-acवडगाव शेरीNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीsunil tingreसुनील टिंगरेChetan Tupeचेतन तुपे