शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून शरद पवारांनी षडयंत्र रचले"

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 11:40 AM

बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते....

धायरी (पुणे) : राज्यात २०१९ मध्ये भाजपला बहुमत असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये यासाठी शरद पवारांनी षडयंत्र रचले. आता त्यांची काय अवस्था आहे हे सर्वजण पाहतच आहात. यंदाच्या बारामती लोकसभेत महायुतीचा उमेदवार जिंकणार, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. बारामती लोकसभा मतदारसंघांतील खडकवासला, पुरंदर, भोर या विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते व भाजप सुपर वॉरियर्स यांचा मेळावा तसेच रॅलीचे आयोजन धायरी येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, कार्यकर्ता हा कुठल्याही संघटनेचा प्राण असतो. भारतीय जनता पक्ष तर कार्यकर्त्यांनीच मोठा केलेला पक्ष आहे. केवळ भाजपतच कुठल्याही कौटुंबिक पार्श्वभूमीशिवाय सामान्य कार्यकर्ता आपल्या असामान्य कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च पदावर जाऊ शकतो. आगामी काळात कार्यकर्त्यांनी मोदीजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून अविश्रांत मेहनत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, लोकसभा प्रवास संयोजक संजय (बाळा) भेगडे, आ. राहुल कुल, आ. भीमराव तपकीर, शहराध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे शहराध्यक्ष वासुदेव काळे, मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, निवडणूक प्रकोष्ठ संयोजक सुनील कर्जतकर, योगेश टिळेकर, वर्षा तापकीर, सचिन मोरे, राजाभाऊ लायगुडे, हरिदास चरवड, प्रसन्न जगताप, राजश्री नवले, अश्विनी पोकळे, राणी भोसले, दत्तात्रय कोल्हे आदींसह पदाधिकारी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

राजकीय आणि संघटनात्मक बांधणी जोरात सुरू

वॉरियर संवाद, बुथ सशक्तीकरण आढावा, भारतीय जनता पार्टी आपल्या दारी, घर चलो अभियान, मेरी मिट्टी मेरा देश आदी कार्यक्रम राबवत भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. लोकसभेला काही अवधी असतानाही आतापासून भाजपने राजकीय आणि संघटनात्मक बांधणी सुरू केली आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस