Sharad Pawar: अजितदादांच्या घरी जाताच शरद पवारांनी जोडले हात, डोळे पाणावले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 07:30 IST2026-02-05T07:29:28+5:302026-02-05T07:30:25+5:30
Baramati News: शरद पवार यांनी पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी बारामतीतील सहयोग निवासस्थानी सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पदाच्या शपथीनंतर त्यांचे सांत्वन केले. यावेळी पवार कुटुंब संपूर्ण उपस्थित होते. तसेच, अजित पवार अध्यक्ष असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.

Sharad Pawar: अजितदादांच्या घरी जाताच शरद पवारांनी जोडले हात, डोळे पाणावले!
लोकमत न्यूज नेटवर्क
बारामती : ज्येष्ठ नेते शरद पवार हे पत्नी प्रतिभा पवार यांच्यासह बुधवारी सायंकाळी बारामतीतील सहयोग सोसायटीमधील निवासस्थानी राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. निवासस्थानी प्रवेश करताच शरद पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेसमोर पुष्प अर्पण करत हात जोडले. हा क्षण पाहताच सुनेत्रा पवार यांचे डोळे पाणावले, तर उपस्थितांचेही मन गहिवरून आले.
#WATCH | NCP-SCP chief Sharad Pawar pays tribute to the late Deputy CM Ajit Pawar at the residence of Deputy CM Sunetra Pawar in Baramati
— ANI (@ANI) February 4, 2026
(Source: NCP) pic.twitter.com/FZWqC9UUi3
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी संपूर्ण पवार कुटुंब सहयोग निवासस्थानी उपस्थित होते. विद्या प्रतिष्ठानमध्ये बुधवारी दुपारी शरद पवार, पार्थ पवार व जय पवार यांच्यात बैठक झाली. बैठकीत अजित पवार अध्यक्ष किंवा संचालक असलेल्या संस्थांमध्ये त्यांच्या जागी पवार कुटुंबातील सदस्यांची वर्णी लावण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.