शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांची प्रकृती पुन्हा बिघडली; पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 10:35 IST

काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणले होते. रूबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून ५ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता

पुणे - काही दिवसांपूर्वीच रुग्णालयातून परतलेले ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. शरद पवारांना पुण्यातील रूबी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अशक्तपणामुळे त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सकाळपासून अशक्तपणा जाणवत होता. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना हायड्रेशनचा त्रास जाणवला. त्यामुळे त्यांना रूबी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहेत. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ट्विट करत पवारांच्या तब्येतीची माहिती दिली. आम्ही बाबांना पुढील चाचण्या आणि हायड्रेशनसाठी पुण्यातील रुबी हॉलमध्ये दाखल करत आहोत असं त्यांनी सांगितले आहे. 

काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे शरद पवारांना बारामतीहून पुण्यात उपचारासाठी आणले होते. रूबी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करून ५ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला होता. पुढील काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला त्यांना देण्यात आला. शिवाय नियमित औषधोपचार सुरू ठेवण्याच्या सूचनाही डॉक्टरांनी दिल्या होत्या. परंतु आता पुन्हा शरद पवारांच्या प्रकृतीत बिघाड झाला आहे. 

अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार तातडीने मुंबईहून बारामतीला गेले होते. तेव्हापासून पुढील १०-१२ दिवस शरद पवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. त्यात थकवा आणि इतर त्रास त्यांना जाणवू लागला होता. खोकल्यामुळे छातीत कफ झाले होते म्हणून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ते बारामतीला परतले. मात्र आज सकाळपासून शरद पवारांना अशक्तपणा जाणवत असल्याने कुटुंबाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : Sharad Pawar's health deteriorates again, admitted to Ruby Hospital

Web Summary : Senior leader Sharad Pawar was admitted to Ruby Hospital, Pune, due to weakness and dehydration. Doctors are monitoring his condition after he experienced fatigue and low water levels. Supriya Sule confirmed his admission for tests and hydration.
टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार