शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्याचे चित्र बघून मोदींचा चेहरा काळा पडलाय, शाह यांची दाढी जळाली; शिंदेंवरही राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रस्तावक होणारे ते चार लोक कोण? राम मंदिरासोबत आहे कनेक्शन!
3
सत्तेच्या हॅटट्रिकसाठी भाजपाची नजर सायलेंट वोटरवर; २०२४ निवडणुकीत करणार करिष्मा?
4
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच दाखल होणार मान्सून; महाराष्टात कधी बरसणार?
5
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदवारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह हे दिग्गज होते उपस्थित
6
Haldiram's वर ब्लॅकस्टोनसह 'या' दिग्गज कंपन्यांची नजर, हजारो कोटींची होणार डील
7
IPL 2024 : रिंकू सिंगचा अतिउत्साही चाहता; चेंडू अशा ठिकाणी लपवला की पोलिसही गोंधळले
8
कोरेगाव भीमा प्रकरणः गौतम नवलखा यांना जामीन, प्रक्षोभक भाषणाच्या आरोपावरून होते नजरकैदेत
9
"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"
10
...म्हणून शरद पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, मोदींनी पुन्हा एकदा डिवचले
11
T20 World Cup 2024 साठी बांगलादेशचा तगडा संघ; २२ वर्षीय खेळाडूला संधी!
12
होर्डिंगच्या पायाभरणीतील 'ती' एक चूक अन् १४ कुटुंबांवर कोसळला दुःखाचा डोंगर!
13
सोनं -चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! दुसऱ्या दिवशीही दर कोसळले; वाचा आजचे दर
14
Fact Check: PM मोदींच्या विजयावर शंका घेणारा नितीश कुमारांचा व्हायरल व्हिडिओ जुना; पाहा, सत्य
15
4 जूनला किती वेळ राहिलाय, थोडा धीर...; पृथ्वीराज चव्हाणांच्या अंदाजावर भुजबळांचा सल्ला
16
'तू आई होऊ शकत नाहीस'; डॉक्टरांनी रुपाली गांगुलीला दिला होता IVF चा सल्ला, पण..
17
पावसानं गुजरातला 'बुडवलं', पण फ्रँचायझीकडून चाहत्यांना 'खुशखबर', केली मोठी घोषणा!
18
हायप्रोफाईल चोर, हवेतल्या हवेत मारायचा मौल्यवान दागिन्यांवर डल्ला, वर्षभरात २०० विमानात केली चोरी 
19
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
20
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू

गणपती बाप्पा मोरया, उद्धव ठाकरेंना सुबुद्धी द्या; मंदिर उघडण्यासाठी भाजपचं शंखनाद आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 2:00 PM

गर्दी करा, कोरोनाला आमंत्रण द्या पण मंदिरं उघडा! पुण्यात भाजपकडून कोरोना नियम धाब्यावर

पुणे: भाजपतर्फे मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर जोरदार आंदोलन सुरू आहे. त्याचे पडसाद पुण्यात देखील पाहायला मिळाले. भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपती परिसरात एकत्र येत शंखनाद आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी  देशासाठी, धर्मासाठी.. भाजप.. भाजप, बोल बजरंगबली की जय, मंदिरांना बंदी, मदिरा विक्रीला संधी अजब हे सरकार, उघड दार उद्धवा, उघड दार उद्धवागणपती बाप्पा मोरया... मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बुद्धी द्या! यासारख्या घोषणा देत भाजपने पुण्यात आंदोलन केले. 

महाराष्ट्रभर भाजपचे मंदिर उघडण्यासाठी आंदोलन सुरू आहे. आज पुण्यातही आंदोलन झालं. या शंखनाद आंदोलनावेळी कसबा मंदिर उघडण्यात आलं. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी महापौर मुक्ता टिळक, सरचिटणीस दीपक पोटे उपस्थित होते. 

मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या बंदोबस्तालाही आव्हान देत मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या आंदोलनात भाजप महिला कार्यकर्त्यांही मोठ्या संख्येने सहभाग झाल्या होत्या. यावेळी कडक पोलीस बंदोबस्त होता. 

यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या गर्दीमुळे मंदिर प्रवेश करतानाही पोलिसांची तारांबळ उडाली. भाजप कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीचा प्रकार घडला. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्यानंतर चंद्रकांत पाटील, महापौर, मुळीक यांनी गणपतीची आरती केली.   

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले,भाजपकडून मंदिरे उघडण्यासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे  आता या बहिऱ्या सरकारला ऐकू येईल ही अपेक्षा आहे. मंदिर उघडी करा, नियम ठरवा, निवडक संख्येत लोकांना मंदिराच्या आत सोडावे. नियमांचं पालन भाविकांनी केलं पाहिजे. अण्णा हजारे निर्भीड व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठींबा आहे. त्यांनी इच्छा व्यक्त केली तर आम्हीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ असेही पाटील यांनी सांगितले. 

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, सर्वात आधी कोरोना पुण्यात आला. पुण्यातच लॉकडाऊन सर्वात आधी लावलं गेलं आहे आणि सर्वात शेवटी लॉकडाऊन उठवलं गेलं आहे. याचा अर्थ पुणेकरांनी आतापर्यंत संयम दाखवला. जनजीवन आता सुरळीत झालेलं आहे . सगळी दुकानं, बाजारं खुली झाली. दारूची दुकानं सुरू केलीत पण मंदिरं सुरू करायला राज्य सरकारला अडचण काय येते आहे हे समजायला तयार नाही.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिरBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटील