शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

राष्ट्रवादीचे आंदोलन .. शनिवारवाडा भाड्याने देणे आहे..!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2019 4:02 PM

लग्न, मुंज, बारसं, डोहाळे जेवण, वाढदिवस, साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारवाडा भाड्याने मिळेल .. इस्टेट एजंट म्हणून मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण आणि पालकमंत्र्यांची नावे

ठळक मुद्देइस्टेट एजंट म्हणून मुख्यमंत्र्यांसह पर्यावरण आणि पालकमंत्र्यांची नावे

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवारवाडा भाड्याने देणे आहे... ज्यांना शनिवारवाडा भाड्याने घ्यावयाचा असेल त्यांनी एजंट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधावा असे उपरोधिक आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केले आहे. राज्य शासनाने गड किल्ल्यांवर हॉटेल आणि रिसॉर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविरुद्ध राष्ट्रवादीच्यावतीने शनिवारवाड्यासमोर आंदोलन करण्यात आले. 

शासनाने वर्ग दोनच्या २५ गड-किल्ल्यांवर हॉटेल व रिसॉर्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरुन सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने शनिवारवाड्यासमोर उपरोधिक आंदोलन करीत राज्य शासनाच्या निर्णयचा निषेध करण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे, प्रवक्ते अंकुश काकडे, माजी महापौर तथा नगरसेवक प्रशांत जगताप, नगरसेवक वनराज आंदेकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शासनाच्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.शिवाजी महाराज व मावळ्यांच्या पराक्रमी इतिहासाचा व गड किल्ल्यांचा अवमान करणाºया भाजपा सरकारचा धिक्कार असो..., लग्न, मुंज, बारसं, डोहाळे जेवण, वाढदिवस, साखरपुडा कार्यक्रमासाठी शनिवारवाडा भाड्याने मिळेल. त्यासाठी एजंट असलेल्या मुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री आणि पालकमंत्र्यांशी संपर्क साधावा असे फलक हातामध्ये धरुन कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. ====गड-किल्ल्यांवर हॉटेल-सिरॉर्ट करायच्या निर्णय घेतना सरकारला लाज वाटायला हवी होती. मुळातच ज्या किल्ल्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, मावळ्यांचे बलिदान आहे त्याची वर्गवारी केली जाते हे दुदैर्वी आहे. कॅबिनेटमध्ये घेतलेला निर्णय लपवून ठेवला गेला याचा अर्थ सरकारच्या मनात काळेबेरे आहे. मुख्यमंत्र्यांनी याविषयी सारवासारव केली असली तरी हा निर्णय घेण्याची दुर्बुध्दी झालीच कशी?- चेतन तुपे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणshanivar wadaशनिवारवाडाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसFortगडJaykumar Rawalजयकुमार रावलNCPराष्ट्रवादी काँग्रेस