शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नमाज पठनासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार; कोंढव्यातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2023 11:05 IST

मस्जिदमध्येच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने ९ वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केला

किरण शिंदे 

पुणे : पुण्यातील कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मस्जिदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेलेल्या एका नऊ वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे. आणि हा सर्व प्रकार केलाय मस्जिदमध्येच काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने. 10 नोव्हेंबर रोजी हा संपूर्ण प्रकार घडलाय. पीडित मुलाच्या मामाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मोहम्मद युसुफ  (रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कोंढवा परिसरातील एका मस्जिदमध्ये तो काम करतो. त्याच्या विरोधा पोक्सो कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा नऊ वर्षीय भाचा कोंढवा परिसरातील एका मस्जिदमध्ये नमाज पठनासाठी जात होता. मात्र तो काही दिवसांपासून जाण्याचे टाळत होता. फिर्यादी यांनी त्याविषयी त्याला खोदून विचारले असता हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. 10 नोव्हेंबर रोजी पीडित मुलगा आपल्या मित्रांसोबत मशिदीमध्ये नमाज पठनासाठी गेला होता. नमाज पठण झाल्यानंतर इतर लोक निघून गेले. पीडित मुलगा आणि त्याचा मित्र मस्जिदमध्येच थांबले होते. 

दरम्यान आरोपी कर्मचाऱ्याने या दोघांना तुम्हाला नमाज कसे पठण करतात हे शिकवतो असे म्हणून तो राहत असलेल्या खोलीत घेऊन गेला. त्याने या दोघांनाही सजदा कसा करतात याविषयी माहिती दिली. त्यानंतर मात्र पीडित मुलाच्या मित्राला घरी जाण्यास सांगितले. त्यानंतर पीडित मुलाला स्वतःच्या मांडीवर बसण्यास भाग पाडून त्याच्यासोबत लैंगिक चाळे केले. पीडित मुलाने घरी गेल्यानंतर आईला हा सर्व प्रकार सांगितला होता. मात्र समाजात बदनामी होईल या भीतीपोटी त्यांनी कोणालाही हा सर्व प्रकार सांगितला नव्हता. 

दरम्यान फिर्यादी यांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार दिली. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्याचे समजल्यानंतर आरोपी पसार झाला आहे. कोंढवा पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेKondhvaकोंढवाPoliceपोलिसSexual abuseलैंगिक शोषणWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारी