उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील वर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 14:48 IST2018-04-10T14:48:35+5:302018-04-10T14:48:35+5:30
क्लिनिकमध्ये उपचारसाठी बोलवून घेत डॉक्टरने तरुणीबरोबर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला.

उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरचे महिलेसोबत अश्लील वर्तन
ठळक मुद्देफेसबुकवरून पीडित महिला आणि डॉक्टरची ओळख
प णे : क्लिनिकमध्ये उपचारसाठी बोलवून घेत डॉक्टरने तरुणीबरोबर अश्लील वर्तन केल्याचा प्रकार कोरेगाव पार्कमध्ये घडला. याप्रकरणी २६ वर्षीय पीडित महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना रविवारी दुपारी घडली. त्यानुसार डॉ. गुरुगोकुल भास्करन गुरुस्वामी ( वय ३०, रामकृष्ण स्ट्रीट, टीचर कॉलनी, ई रोड, कोईम्तुर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुस्वामी याने मेडिकल कॅम्प विषयी संपर्क करण्यासाठी फेसबुकवर मोबाईल नंबर दिला होता. त्यावरून पीडित महिला आणि डॉक्टरची ओळख झाली होती. पीडित महिला एका आजाराने त्रस्त असल्याचे तिने डॉक्टरांना सांगितले होते. त्यानुसार गुरुस्वामी याने तपासणीसाठी महिलेला दवाखान्यात बोलावले होते. महिला जेव्हा तपासणीसाठी गेली होती तेव्हा दवाखान्यात इतर कुणीही रुग्ण नव्हते. त्याचा फायदा घेत उपचाराच्या नावाखाली डॉक्टरने महिलेसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणाचा पुढीस तपास सहायक पोलीस निरीक्षक खेडकर करत आहेत.