सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 15:05 IST2021-07-11T15:05:29+5:302021-07-11T15:05:58+5:30

प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मी तुला व तुझ्या पप्पाला मारुन टाकीन अशी तरुणाकडून धमकी

Sexual abuse of a seven-year-old girl; Crime filed against the youth | सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणावर गुन्हा दाखल

पुणे: सात वर्षाच्या अल्पवयीन मुलीला लाडीगोडी लावून म्हाडा कॉलनीत घेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एका १९ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. देवा नाडे असे या तरुणाचे नाव आहे.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. एकाच वस्तीत राहणाऱ्या देवा याने ७ वर्षाच्या मुलीला लाडीगोडी लावून म्हाडा कॉलनीतील नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकाराबाबत कोणाला सांगितले तर मी तुला व तुझ्या पप्पाला मारुन टाकीन अशी धमकी दिली. त्यामुळे तिने हा प्रकार ऑगस्ट २०१९ पासून सुरु होता. हडपसर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Sexual abuse of a seven-year-old girl; Crime filed against the youth