Sexual abuse of four-year-old girl ; incident in Bhosari: Arrested young man | चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; भोसरीतील प्रकार : तरुणाला अटक

चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार; भोसरीतील प्रकार : तरुणाला अटक

ठळक मुद्देयाप्रकरणी ३० वर्षीय महिलेची भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपरी : घराबाहेर खेळत असलेल्या चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. भोसरी येथे रविवारी (दि. १५) रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. 
अखिलेशकुमार देवानंदसिंग सिंग (वय २७, रा. भोसरी) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ३० वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची चार वर्षीय मुलगी घराबाहेर खेळत होती. त्यावेळी आरोपी याने लैंगिक अत्याचार करण्याच्या हेतून तिला जबरदस्तीने घरात घेऊन गेला. तसेच मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Sexual abuse of four-year-old girl ; incident in Bhosari: Arrested young man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.