शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

खुशखबर..! उजनीत चोवीस तासांत सात टीएमसी पाणी जमा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2019 20:02 IST

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात दमदार पाऊस : खडकवासला साखळीत २३.८५ टीएमसी साठा 

पुणे : जिल्ह्यातील धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरु असून, सहा धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे उजनी धरणातीलपाणीसाठ्यात वेगाने वाढ  होत आहे. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत धरणात ७.१६ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा जमाझाला होता. तर, खडकवासला साखळीतील चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी (८१.८३ टक्के) पाणी जमा झाले आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान असलेले उजनी धरण हे तब्बल ११७ टीएमसीचे आहे. त्यापैकी ६३.६५ टीएमसी मृत व ५३.५७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. जून महिन्याच्या सुरुवातीस धरणांत खडखडाट होता. पावसाने ओढ दिल्याने यंदा उजनी धरण उपयुक्त साठ्यामधे येते की नाही, अशी शंका व्यक्त होत होती. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कुकडी आणि भीमा खोºयात दमदार पाऊस झाला. त्या नंतर पुन्हा पावसाने दडी मारली. गेले चार-पाच दिवस धरण क्षेत्रात पावसाचा चांगला जोर आहे. त्यामुळे,जिल्ह्यातील धरणात साठ ते शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. बुधवारी दिवसभर जिल्ह्यातील बहुतांश धरणात पावसाचा जोर कमी होता. वडज धरणातून २ हजार ३६६ क्युसेक वेगाने सोडण्यात येणारे पाणी सायंकाळी १२२० क्युसेक पर्यंत खाली आणले. चासकमान भरण्याच्या मार्गावर असल्याने सायंकाळी ३६८५ क्युसेक वेगाने पाणी नदीत सोडण्यात येत होते. वडीवळे १२५६, आंद्रा २०४५, कासारसाई धरणातून २०० क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. खडकवासला धरणातून सकाळी ९,४१६ क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. बुधवारी दिवसभर पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासल्यातील विसर्ग २,५६८ क्युसेकपर्यंत खाली आणला. वीर धरणात पाण्याची आवक वाढल्याने येथून सायंकाळी तब्बल २२ हजार ६८० क्युसेकने पाणी नदीत सोडण्यात येत होते. जिल्ह्यातील धरणांतून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होत असल्याने उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणी जमा होत आहे. उजनीत मंगळवारी सकाळी उणे ०.९७ टीएमसी साठा होता. सायंकळापर्यंत धरणातील उपयुक्त साठ्यात वाढ होऊ लागली. बुधवारी सकाळी आठपर्यंत उजनीत ४.०८ टीएमसी पाणीसाठा झाला. सायंकाळी साडेपाच पर्यंत त्यात ७.१६ टीएमसी पाणीसाठा झाला. ---खडकवासला साखळीत जोरदार पाऊसखडकवासला साखळीतील टेमघर धरणात बुधवारी सकाळी आठ पर्यंत ९०, वरसगाव ८०, पानशेत ७८ आणि खडकवासला येथे ४० मिलिमीटर पाऊस झाला. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत टेमघर २०, वरसगाव ७० आणि पानशेतला ७७ मिलिमीटर पाऊस झाला. खडकवासला धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. खडकवासला धरणात १.९७, पानशेत ९.७१, वरसगाव ९.६९ आणि टेमघर धरणात २.४१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणात मिळून २३.८५ टीएमसी पाणी (८१.८३ टक्के) जमा झाले आहे.  

टॅग्स :PuneपुणेUjine Damउजनी धरणWaterपाणीRainपाऊसDamधरण