विवाहित मुलीला पळवले; इज्जतीसाठी मुलाच्या घरातील सात जणांनी संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 17:26 IST2023-01-24T16:59:18+5:302023-01-24T17:26:11+5:30

गेल्या सहा दिवसांत भीमा नदीत सात मृतदेह आढळले आहेत.

Seven people in a family committed suicide for honor son a married girl pune crime | विवाहित मुलीला पळवले; इज्जतीसाठी मुलाच्या घरातील सात जणांनी संपवले जीवन

विवाहित मुलीला पळवले; इज्जतीसाठी मुलाच्या घरातील सात जणांनी संपवले जीवन

पुणे :पुणे जिल्ह्यात भीमा नदीत सात मृतदेह सापडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुलाने मुलीला पळवल्यानं कुटुंबातील सात जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हे कुटुंब बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील खामगाव गावातील आहे. या सर्वांनी १७ जानेवारीला आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

मोहन उत्तम पवार (४८),  संगीता मोहन पवार (४५) या दोघांची मुलगी राणी शाम फुलवरे (२५) आणि जावई शाम फुलवरे (२८) तसेच त्यांची तीन मुलांनी आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. मोहन पवार यांच्या मुलाने नात्यातील एक विवाहित मुलगी पळवून आणली होती. या घटनेने ते अस्वस्थ होते. त्या मुलीला घरी सोडून न आल्यामुळे सात जणांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळतेय. 

आत्महत्येचा इशाराही दिला होता-

पोलिसांनी या घटनेचा प्राथमिक तपास केला आहे. मात्र या प्राथमिक तपासाचे पुढील माहिती समोर आली आहे, मोहन पवार यांना दोन मुले आहेत. त्यापैकी अमोल हा त्यांच्याजवळ राहतो, तर राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने दोन दिवसांपूर्वी त्यांच्या नात्यातीलच एक विवाहित मुलगी पळून आणली. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले होते. या दोघांनी विवाहित मुलीला 24 तासात सोडून येण्यास सांगितले होते. यामुळे आपल्या इज्जत जाईल, नाहीतर आम्ही सर्वजण विष पितो किंवा जीव तरी देतो अशा प्रकारचा इशारा त्यांनी दिला होता.

चिमुरड्यांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत होते-

त्यानंतर मुलगा अमोल घरी माघारी आला नाही. शेवटी त्यांनी पुण्यात असलेल्या मुलाला (राहुलला) फोन केला आणि सर्व घटना सांगितली. जर अमोल परतला नाही, तर आम्ही आमचा जीव देऊ असे मोहन पवार यांनी राहुलला शेवटच्या क्षणी सांगितले. त्यानंतर ते जे गायब झाले, ते कालपर्यंत आढळलेल्या मृतदेहाच्या माध्यमातूनच पुढे आले. आज सकाळी तीन चिमुरडे पोलिसांच्या आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हाती लागले, तेव्हा पाहणाऱ्यांच्या अंगावर सरसरून काटा आला.

Web Title: Seven people in a family committed suicide for honor son a married girl pune crime