दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 17:47 IST2019-05-10T17:46:27+5:302019-05-10T17:47:16+5:30
पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोडी येथे पोलीस चौकीत धिंगाणा घालणाºया सात जणांना अटक
पिंपरी : पोलिसांना वर्दी उतरवण्याची धमकी देत पोलीस चौकीतच धिंगाणा घालणाऱ्या २२ जणांविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास दापोडी पोलीस चौकीत घडली. पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जयेश विनोद चव्हाण (वय २२), तेजस विनोद चव्हाण (वय १९, रा. औंध हॉस्पीटल क्वॉटर्स), अशोक पाचू चव्हाण (वय ५४), सुनिल अशोक चव्हाण (वय २८), शुभम अशोक चव्हाण (वय २३), ललिता अशोक चव्हाण (वय ४५, सर्व रा. संगमवाडी, खडकी) आणि किरण विशाल ननावरे (वय ३१, रा. मुळा रोड, खडकी) अशी अटक केलेल्या सात जणांची नावे आहेत. इतर १५ जण पसार आहेत.
मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास पोलीस हवालदार सुरेश मुंडे यांना पोलीस नियंत्रण कक्षाकडून कॉल होता. यामुळे हवालदार मुंडे हे शिपाई म्हेत्रे आणि बिरारीस यांच्यासोबत जात होते. त्यावेळी दापोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकाजवळ सुशील आणि शुभम यांचे भांडण सुरू होते. ते दोघे एकमेकांना बीअरची बाटली आणि दगडाने मारहाण करत होते. त्यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पोलीस चौकीत नेले. यावेळी आरोपींनी पोलीस चौकीजवळ बेकायदेशीर जमाव जमवला. तसेच हवालदार मुंडे यांंना शिवीगाळ करत जातीवाचक बोलल्याची खोटी तक्रार करून वर्दी उतरवण्याची धमकी दिली.
...........