शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

सात लाख पुणेकर वेठीस!

By admin | Updated: October 2, 2015 01:13 IST

पीएमपीला भाडेतत्त्वावर बससेवा पुरविणाऱ्या ५ ठेकेदारांनी आपल्या मागण्यांसाठी संचलनातील तब्बल ६५३ बस बंद ठेवल्याने गुरुवारी चाकरमानी पुणेकरांचे चांगलेच हाल झाले.

पुणे : पीएमपीला भाडेतत्त्वावर बससेवा पुरविणाऱ्या ५ ठेकेदारांनी आपल्या मागण्यांसाठी संचलनातील तब्बल ६५३ बस बंद ठेवल्याने गुरुवारी चाकरमानी पुणेकरांचे चांगलेच हाल झाले. विशेष म्हणजे, याची कोणतीही पूर्व कल्पना पीएमपीला न देताच दुपारनंतर ठेकेदारांनी ही वाहने अचानक बंद केल्याने, तब्बल ७ लाख प्रवाशांना त्याचा फटका बसला. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल पीएमपी प्रशासनाने घेतली असून, उद्या (शुक्रवारी) ठेकेदारांनी या बसेस रस्त्यावर न आणल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण अधिनियम (मेस्मा) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत दिला.थकबाकी १४ कोटी कांगावा ६० कोटींचा या बस बंद करण्यापूर्वी काही तास आधी संबंधित पाच ठेकेदारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले; तसेच पीएमपीकडून करारातील अटींचा भंग करून, ठेकेदारांकडून दंड वसूल केला जात असल्याचा आरोप केला; मात्र ही पूर्णत: चुकीची बाब असल्याचे कृष्णा यांनी पत्रकार परिषदेत कागदपत्रांच्या आधारे निदर्शनास आणून दिले. या पाचही ठेकेदारांना १५ आॅगस्ट २०१५ पर्यंतची सर्व रक्कम देण्यात आली असून, त्यांची केवळ ३० सप्टेंबरपर्यंतची १४ कोटी रुपये थकबाकी शिल्लक असल्याचे दाखवून दिले; तसेच पीपीपी तत्त्वावरील बसची रक्कम वजा केल्यास केवळ ९ कोटींचे ठेकेदारांचे देणे असल्याचा दावा कृष्णा यांनी केला आहे. या ठेकेदारांच्या बसेससाठी पार्किंग, ड्रायव्हर, दररोज सीएनजी; तसेच बसच्या स्वच्छतेचा तब्बल ४२ टक्के खर्च पीएमपी आधी करते; तसेच ही रक्कम नंतर बिलातून वजा केली जाते. त्यामुळे ठेकेदारांचे आरोप बिनबुडाचे असल्याचे ते म्हणाले. या शिवाय त्यांच्याकडून केली जाणारी दंड वसुली ही नियमानुसार असून, ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षरीनेच हा दंड निश्चित केला जात असल्याची कागदपत्रेही कृष्णा यांनी सादर केली; तसेच त्यांच्या तक्रारी असतील, तर त्यांनी आम्हाला कधीच त्याबाबत पत्रव्यवहार केला नाही; तसेच एवढी थकबाकी आहे, तर ती आधी का निदर्शनास आणून दिली नाही, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला. सात लाख पुणेकर वेठीस! पीएमपीचे प्रामुख्याने नोकरदारवर्ग, शालेय विद्यार्थी; तसेच कष्टकरीवर्गाचे प्रवासी अधिक आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे सकाळी ते आपल्या कामावर पोहोचले होते. त्यानंतर दुपारी ठेकेदारांनी बस बंद केल्याची कल्पना कोणासही नव्हती; मात्र सायंकाळी पाचनंतर शाळा आणि शासकीय कार्यालये; तसेच खासगी कार्यालयांची कामाची वेळ संपल्यानंतर, शहरातील सर्वच बसथांब्यांवर प्रवाशांच्या रांगा लागल्या होत्या. संचलनातील जवळपास ५० टक्के बस एकाच वेळी बंद झाल्याने, अनेक मार्गांवर अर्ध्या तासाला येणारी बस जवळपास दीड ते दोन तासांनी गर्दीने भरून येत होती. त्यामुळे नागरिक पुरते हैराण झाले होते. त्यातच काहीच माहिती नसल्याने प्रवाशांचा आणखी गोंधळ उडत होता. अखेर बस येत नसल्याने; तसेच आलेल्या बसमध्ये बसण्यासाठी जागाच नसल्याने अनेकांना आर्थिक झळ सोसून रिक्षा; तसेच खासगी वाहनांचा आधार घेऊन घर गाठावे लागले.पूर्व कल्पना न देताच बंद पीएमपीने दररोज तब्बल १२ लाख प्रवासी प्रवास करतात. पीएमपीच्या मालकीच्या बसची संख्या कमी असल्याने पीएमपीकडून सात वर्षांच्या भाडेकराराने तब्बल ६५३, तर पीपीपी तत्त्वावर २०० बस घेण्यात आल्या आहे. गुरुवारी पीएमपी प्रवाशांची संख्या अधिक असल्याने पीएमपीकडून सुमारे १५०६ बस रस्त्यांवर आणण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार, पहिल्या शिफ्ट रस्त्यावर आल्या. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास ठेकेदारांनी अचानक कोणतीही माहिती अथवा पूर्व कल्पना न देता, सकाळ शिफ्ट मधील; तसेच दुसऱ्या शिफ्टमध्ये रस्त्यावर येणाऱ्या सर्व बस थांबविल्या. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. दुपारी एकपर्यंत याची साधी कुणकुण पीएमपी प्रशासनास लागू देण्यात आली नाही. दुपारी १ नंतर जेव्हा ठेकेदारांच्या बस येत नसल्याचे लक्षात आले, तेव्हा पीएमपी प्रशासनाला या प्रकाराची माहिती मिळाली.पीएमपीकडून हजार बसचे नियोजन दुपारनंतर अचानक ठेकेदारांनी बंद पुकारल्याने पीएमपीचे नियोजन अक्षरश: कोलमडले होते. त्यातच पीएमपीच्या अवघ्या ७५० बस संचलनात असल्याने सायंकाळी नियोजन करणे जिकिरीचे बनले होते; मात्र अचानक आलेल्या या आपत्तीवर मात करण्यासाठी पीएमपीकडून तातडीने ब्रेकडाउनसाठी; तसेच देखभाल दुरुस्तीसाठी आलेल्या बसचे काम थांबवून तब्बल अडीचशे जादा बस रस्त्यावर आणून सायंकाळी ५ नंतर जवळपास ९०० बस रस्त्यावर उतरविण्यात आल्या होत्या. मात्र, ही संख्या दैनंदिन मार्गावरील बसपेक्षा कमी असल्याने प्रवाशांच्या गर्दीने सर्व बसथांबे ओसंडून वाहत होते; मात्र त्याची कोणतीही कल्पना प्रवाशांना नसल्याने अनेक जण ताटकळत बसथांब्यांवर उभे असल्याचे दिसून आले. हा प्रकार म्हणजे, पीएमपी प्रशासनाचा त्रास देण्याचा प्रयत्न आहे. हा प्रकार म्हणजे थेट ब्लॅकमेलिंग असून, तो कधीही सहन केला जाणार नाही. ठेकेदारांशी झालेल्या करारानुसार, त्यांनी कोणतीही कल्पना न देता हा बंद पुकारला आहे. त्यांच्या तक्रारी असल्यास, त्यांनी त्या लेखी कळविणे आवश्यक आहे; मात्र तसा साधा अर्जही ठेकेदारांनी केलेला नाही. या प्रकरणानंतर ठेकेदारांशी संपर्क साधला असता, त्यांनी मोबाईल बंद करून ठेवले होते. त्यांनी उद्या बस रस्त्यावर न आणल्यास, मेस्मा लावला जाईल.- अभिषेक कृष्णा (अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पीएमपी)