शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सात कोटींच्या कामांना मंजुरी

By admin | Updated: January 14, 2015 03:11 IST

शिक्षण मंडळाने स्थायी समिती सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ऐनवेळचा विषय म्हणून स्थायी समितीपुढे ठेवून मंजुरी घेतली

पिंपरी : शिक्षण मंडळाने स्थायी समिती सदस्यांना कोणतीही पूर्वकल्पना न देता २०१५-१६ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प ऐनवेळचा विषय म्हणून स्थायी समितीपुढे ठेवून मंजुरी घेतली. शिक्षण मंडळाच्या कामकाजाच्या या कृतीबद्दल स्थायी समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. या सभेत विविध विकास कामांच्या ७ कोटी ४७ लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी शांताराम भालेकर होते. राजीव गांधी पूल सांगवी ते मुकाई चौक- किवळे बीआरटी रस्त्याचे सुशोभीकरण व अन्य कामे करण्यासाठी १ कोटी ३३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक २९ मध्ये रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी ९३ लाख ८१ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्रमांक ३७ महात्मा फुलेनगर येथील नाल्यावर सी डी वर्क करण्यासाठी ४८ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्रभाग क्रमांक ३३ गवळीनगर येथे रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी २८ लाख ६७ हजार रुपये खर्च येणार आहे. कासारवाडी मैलाशुद्धिकरण केंद्रांतर्गत ड प्रभागातील मुख्य गुरुत्वनलिका, पंपिंग स्टेशन यामध्ये सुधारणा घडवून आणल्या जाणार आहेत. त्यासाठी येणाऱ्या ३२ लाख ८६ हजार रुपये खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली. थेरगाव गावठाण येथे जलनि:सारणविषयक कामे करण्यासाठी २९ लाख ९४ हजार रुपये खर्च येणार आहे. दिघी येथे जलनि:सारण नलिका टाकण्यासाठी २७ लाख ३८ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. चऱ्होलीतील वाड्या-वस्त्यांवर रस्त्यांची कामे करण्यासाठी ६६ लाख २७ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)