क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा

By भाग्यश्री गिलडा | Updated: March 29, 2024 16:02 IST2024-03-29T16:02:17+5:302024-03-29T16:02:45+5:30

क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले

Seven and a half lakhs cheated by lure of investing in crypto trading | क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा

क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने साडेसात लाखांना गंडा

पुणे : क्रिप्टो करन्सी ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एकाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी गुरुवारी (दि. २८) चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खरेदी परिसरात राहणाऱ्या जसदेव कुलजित सिंग (वय- ४३) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार १ डिसेंबर २०२३ ते ३ डिसेंबर २०२३ दरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे तक्रारदार यांना अनोळखी व्यक्तीने व्हॅट्सऍपवर मेसेज पाठवला. क्रिप्टो करन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास भरपूर नफा मिळेल असे सांगून तक्रारदार यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केले. गुंतवणूक केल्यास प्रचंड पैसे आहे, असे भासवून तक्रारदार यांना पैसे गुंतवण्यास भाग पाडले. त्यानंतर बनावट वेबसाईटच्या आधारे खोटा नफा मिळत असल्याचे भासवून तक्रारदार यांना एकूण ७ लाख ४५ हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले. मात्र प्रत्यक्षात ते पैसे विड्रॉल केले असता त्यामध्ये अडचणी येत होत्या, त्यामुळे तक्रारदार यांनी विचारणा केली असता पैसे काढण्यासाठी आणखी पैसे भरावे लागतील असा तगादा लावण्यात आला. आपली फसवणूक झाली असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Seven and a half lakhs cheated by lure of investing in crypto trading