शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

दुय्यम निबंधक कार्यालयाचा ‘सर्व्हर डाऊन’; नागरिकांची प्रचंड गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 5:20 AM

गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे.

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून नोंदणी व मुद्रांक विभागाच्या दस्त नोंदणी प्रणालीमधील सर्व्हरचा वेग कमी होणे अथवा सर्व्हर डाऊन होण्याचे प्रमाण वाढले आहे. शुक्रवारी संपूर्ण राज्यातील सर्व्हर सकाळी कार्यालय सुरू झाल्यानंतर लगेचच डाऊन झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली आहे. सर्व्हर डाऊनमुळे दुय्यम निबंधक कार्यालयात गेलेल्या नागरिकांना तासन्तास वाट पाहावी लागत आहे.सदनिका, दुकाने, जमीन आदींच्या खरेदी-विक्रीसाठी नागरिकांना नोंदणी विभागाच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जावे लागते. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने दस्त नोंदणीसाठी आॅनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. दस्त नोंदणीची ही संगणकप्रणाली राष्ट्रीय सूचना केंद्राने (एनआयसी) विकसित केली आहे. या प्रणालीसाठीचे तांत्रिक सहकार्य हे एनआयसीकडून दिले जाते. राज्यात सुमारे ५०६ दुय्यम निबंधक कार्यालये असून या कार्यालयांमध्ये सदनिका, दुकाने, जमीन आदींचे खरेदी-विक्रीचे व्यवहार तसेच भाडेकरार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र आदी प्रकारचे दस्त नोंदविले जातात. या कार्यालयांमध्ये हे दस्त नोंदविण्यासाठी नागरिकांची नेहमी गर्दी असते. राज्यात रोज सरासरी आठ ते नऊ हजार दस्तांची नोंदणी होते.नोंदणी व मुद्रांक विभाग राज्याला महसूल देणारा दुसºया क्रमांकाचा विभाग आहे. दरवर्षी सुमारे २१ हजार कोटींचा महसूल राज्य शासनाच्या तिजोरीत जमा होतो. तसेच कार्यालयात येणाºया नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. याविषयी असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने सोमवारी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक अनिल कवडे यांची भेट घेतली. नोंदणी विभागातील या समस्येवर आवश्यक ती कार्यवाही करून कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची मागणी असोसिएशन आॅफ रिअल इस्टेट एजंट्स या संघटनेने नोंदणी महानिरीक्षकांकडे केली आहे. या वेळी असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, संजय ढोकळे, राजेंद्र जोशी, उमाशंकर यादव आदी उपस्थित होते.- दस्त नोंदणी प्रणालीमधील तांत्रिक समस्या अथवा सर्व्हरच्या डाऊन होण्यामुळे दस्त नोंदणीचे काम संथगतीने सुरू होते. अपेक्षित वेग मिळत नसल्याने दस्त नोंदणीसाठी नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे, तर काहींना दस्त नोंदणीसाठी दुसºया दिवशी पुन्हा कार्यालयात यावे लागत आहे. मागील काही महिन्यांपासून दस्त नोंदणीच्या प्रणालीमधील तांत्रिक समस्या वाढल्या आहेत. त्यामुळे दस्त नोंदणीचे काम अपेक्षित वेगाने होत नाही. याविषयी वारंवार नागरिकांनी आपल्या तक्रारी राज्याच्या नोंदणी व मुद्रांक विभागात दिल्या आहेत. तरी यावर तोडगा काढण्यात नोंदणी विभागाला यश आलेले नाही.

टॅग्स :Puneपुणे