शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Navale Bridge Pune: अपघातांची मालिका सुरूच; प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेचा 'महायज्ञ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 13:59 IST

नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे

ठळक मुद्देअपघात होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असून त्यावर तात्काळ उपयोजना करणे आवश्यक

धायरी : मुंबई- बंगळुरू ह्या राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पुल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघात होत असून याला राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे विभाग प्रमुख नीलेश गिरमे यांनी केला. झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने महायज्ञ करण्यात आला. नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतार आहे यामुळे वाहने वेगाने जात असतात परंतु या वाहनाच्या वेगांवर कोणतीच मर्यादा न ठेवल्यामुळे सातत्याने अपघतात वाढ होत आहे, त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. 

 गेल्या वर्षी मुंबई-बंगळुरू महामार्गावर नवले पुल परिसरात सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर धायरी परिसरातील नागरिक, राष्ट्रीय महामार्ग, वाहतूक पोलीस आणि पालिका अधिकारी यांच्या सोबत अपघात रोखण्यासाठी बैठकीचे आयोजन केली होती. परंतु त्या वेळी तात्पुरत्या स्वरूपात उपाय योजना केल्या गेल्या होत्या. त्यानंतर परिस्थिती जैसे थे झाली आणि पुन्हा अपघातची मालिका सुरू झाली आहे. 

या ठिकाणी अपघात होण्यास अनेक गोष्टी कारणीभूत असून त्यावर तात्काळ उपयोजना करणे आवश्यक आहे. यामध्ये नवीन कात्रज बोगदा ते नवले पुलापर्यंतच्या महामार्गावरील तीव्र उतारावर वेग मर्यादा ८० वरून ४० प्रति तास करण्यात यावी, तसेच त्याचे फलक लावण्यात यावेत, स्टड लाईट बसवावेत तसेच विविध ठिकाणी रम्बल स्ट्रीप,  सोलर बिल्कर् देखील लावण्यात यावेत, कर्ब पेंटिंग करावे, वाहन चालकांना ड्रिंक अँड ड्राईव्ह, गो स्लोव, अपघात प्रवण क्षेत्र वाहने सावकाश चालावा अश्या सूचना देणारे फलक लावण्यात यावेत.

महामार्गावर सातत्याने पडणारे खड्डे यावर ठोस पावले उचलणे आवश्यक आहे. त्याचबरोबर महामार्गावरील तीव्र उतार कमी करणे, ह्या सर्व उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने तात्काळ पूर्ण करणे आवश्यक आहे, तसे न झाल्यास शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या कार्यालयात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शिवसेना विभाग प्रमुख नीलेश गिरमे यांनी दिला आहे. 

टॅग्स :DhayariधायरीPuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv Senaशिवसेना