शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यात खळबळजनक घटना! ग्रामस्थांनी नराधमाच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 10:29 IST

गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही, ग्रामस्थांची भूमिका

राजगुरुनगर: मांजरेवाडी धर्म (ता खेड ) गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निघृणपणे खून केल्याप्रकरणी नराधम आरोपीचे घर अज्ञातांनी घर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आरोपी फाशी देण्याची मागणी होत आहे.

मांजरेवाडीतील संतापजनक घटनेनंतर शुक्रवार दि १८ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला. घराच्या खिडकीतुन आगीचे बोळे आत फेकल्याने आग घरातही आग लागली. यावेळी पोलिसांसह आग्निशामक दलाच्या गाडी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आरोपीच्या घरासमोर दोन पोलीसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाहीतर गाव शांत बसणार नाही. अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

 खेड तालुक्यातील मांजरेवाडी (धर्म ) ता खेड ) येथील अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. आरोपीला जलद गती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा होण्यासाठी मांजरेवाडी ग्रामस्थांनी कॅण्डल मोर्चा काढला होता. आरोपी नवनाथ कैलास मांजरे ( वय २९ रा मांजरेवाडी धर्म ता खेड ) या नराधमाने अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलीला गाडीवर बसून शेतात नेऊन बलात्कार केला. तसेच तिचा दगडाने ठेचून अमानुषपणे खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भीमा नदीच्या पाण्यात टाकला.या घटनेचा सर्व स्तरांतून निषेध व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीKhedखेडWomenमहिलाArrestअटकDeathमृत्यू