लोणावळ्यात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:04 IST2020-01-02T19:00:45+5:302020-01-02T19:04:23+5:30
हा अपघात नसून चोरी करुन केलेला खून असल्याचे प्राथमिक तपासात समोर

लोणावळ्यात घरात चोरी करुन ज्येष्ठ महिलेचा खून
लोणावळा : लोणावळ्यातील द्वारकामाई सोसायटीमध्ये आज दुपारच्या सुमारास एका ज्येष्ठ महिलेचा घरात चोरी करुन खून केला असल्याची धक्कादायक घटना घडली. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
रेश्मा पुरुषोत्तम बनसल/अगरवाल (वय 70, रा. द्वारकामाई सोसायटी, लोणावळा) असे या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, द्वारकाईमाई सोसायटीमध्ये राहणार्या रेश्मा बन्सल ह्या आज सकाळी घरात एकट्याच होत्या. नित्य नियमांने त्या त्यांचे पती पुरुषोत्तम बनसल यांना दुपारी साडेबारा एक वाजता जेवणाचा डबा घेऊन दुकानावर जातात. आज त्या आल्या नाहीत म्हणून ते घरी आले असता दरवाजा बंद होता.