जेष्ठ महिलेला आईसक्रीम खाणे पडले ६८ हजाराला; खेड तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 18:14 IST2022-04-28T18:14:36+5:302022-04-28T18:14:47+5:30
महिलेने खेड पोलीस ठाण्यात दिली तक्रार

जेष्ठ महिलेला आईसक्रीम खाणे पडले ६८ हजाराला; खेड तालुक्यातील घटना
राजगुरुनगर : जेष्ठ महिलेला आईसक्रीम खाणे चांगलेच महागात पडले. गर्दीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे ६८ हजारांचा गळ्यातील सोन्याचा दागिना अज्ञात चोरट्यांनी लांबविला. हि घटना खरपुडी ( ता खेड ) येथे घडली असुन कुलाबाई गुलाब रेटवडे (वय ५५ रा. रेटवडी ता. खेड ) या महिलेने खेड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द फिर्याद दिली आहे.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि २७ रोजी बुधवारी खरपुडी बुद्रुक येथे पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाकरीता कलाबाई रेटवडे ह्या जेष्ठ महिला आल्या होत्या. पुण्यस्मरणानिमित्त किर्तनाचा कार्यक्रम संपल्यानंतर जेवण करून रेटवडे ह्या आईसक्रीम खाण्यासाठी मंडपाच्या बाहेर गेल्या. दरम्यान तेथे किर्तन संपल्यामुळे लोकांची मोठया प्रमाणात गर्दीचा जमली होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांने रेटवडे याच्या गळ्यातील ६८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्यांने लांबविले.