पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

By विवेक भुसे | Updated: September 5, 2022 09:49 IST2022-09-05T09:48:49+5:302022-09-05T09:49:34+5:30

स्वाती देसाई या जवळपास २५ हून अधिक वर्षे पोलीस दलात कार्यरत होत्या

Senior Police Inspector Swati Desai passed away | पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

पुणे पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे निधन

पुणे : वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती विवेक देसाई यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या. बिबवेवाडी येथील महेश सोसायटीमधील निवासस्थानापासून त्यांची सोमवारी सकाळी अंत्ययात्रा निघेल. वैकुंठ स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

स्वाती देसाई या जवळपास २५ हून अधिक वर्षे पोलीस दलात कार्यरत होत्या. त्यांनी काही काळ सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले होते. पुणे शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेत काही काळ काम केल्यानंतर त्यांची सहकारनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून बदली झाली होती. सध्या त्या विशेष शाखेत कार्यरत होत्या.

Web Title: Senior Police Inspector Swati Desai passed away