गुंडाकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 21:25 IST2020-12-26T21:24:50+5:302020-12-26T21:25:34+5:30
२ पिस्तुले आणि ४ काडतुसे असा १ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत

गुंडाकडून दोन पिस्तुलांसह काडतुसे जप्त; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
पुणे : घाेरपडे उद्यान परिसरात पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडाला गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने पकडले. त्याच्याकडून २ पिस्तुलांसह ४ काडतुसे जप्त करण्यात आली. रोहित दिलीप माने (वय २८, रा. लाेहियानगर) असे अटक केलेल्या गुंडाचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक घोरपडे पेठेत गस्त घालत होते. त्यावेळी गंभीर गुन्हे दाखल असलेला माने हा घोरपडे उद्यान परिसरात थांबल्याची माहिती पोलीस हवालदार अजय थोरात आणि अमोल पवारं यांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून मानेला पकडण्यात आले. त्याच्याकडून २ पिस्तुले आणि ४ काडतुसे असा १ लाख २४ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आली. माने याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न, मारामारी, शस्त्र बाळगणे अशा स्वरुपाचे ९ गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, सतीश भालेकर, योगेश जगताप, इम्रान शेख, अय्याज दड्डीकर, शशीकांत दरेकर, तुषार माळवदकर यांनी ही कामगिरी केली.