दुसऱ्या फेरीत अडीच हजार प्रवेश

By Admin | Updated: July 3, 2015 00:26 IST2015-07-03T00:26:11+5:302015-07-03T00:26:11+5:30

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दुस-या फेरीतून गुरूवारी २,८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला.

In the second round, two and a half thousand admissions | दुसऱ्या फेरीत अडीच हजार प्रवेश

दुसऱ्या फेरीत अडीच हजार प्रवेश


पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रातील अकरावीच्या जागांसाठी राबविल्या जात असलेल्या आॅनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत दुस-या फेरीतून गुरूवारी २,८६० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. दुस-या फेरीतून बेटरमेंटची संधी आणि नव्याने प्रवेश मिळालेल्या विद्यार्थांनी येत्या ४ जुलैपर्यंत प्रवेश घेणे आवश्यक आहे, असे पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे कळविले आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार गुरूवारी विज्ञान शाखेतील १,५७९, वाणिज्य शाखेतील १,२०६ विद्यार्थ्यांनी तर कला शाखेतील ७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. आॅनलाईन प्रवेशाच्या दुस-या फेरीतून ९,१०२ विद्यार्थ्यांना बेटरमेंटची संधी मिळाली आहे.तर दुस-या प्रवेश फेरीतून प्रवेश देण्यासाठी ३,६१३ नवीन विद्यार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाने दुस-या यादीतून एकूण १२,७१५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे.त्यातील केवळ २,८६० विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत प्रवेश घेतला आहे. दुस-या यादीतून प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी ५० रुपये शुल्क भरून तात्काळ प्रवेश घेणे आवश्यक आहे.(प्रतिनिधी)

Web Title: In the second round, two and a half thousand admissions