शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

राज्यात कोरोनाचा कहर, पुण्यात 14 मार्चपर्यंत शाळा महाविद्यालये, कोचिंग बंद, प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 3:09 PM

आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. (Pune Municipal Corporation)

ठळक मुद्देपुण्यात 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंदराज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.पुण्या शिवाय महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही महापालिकेने 5 ते 9 आणि 11वीच्या ट्यूशन 15 मार्चपर्यंत बंद

पुणे - कोरोना रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होत असल्याने पुण्यात 14 मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. हाच धोका लक्षात घेत पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

बंद दरम्यानही वीज कापण्याची मोहीम सुरूच, महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह

आयुक्तांनी काढलेल्या आदेशानुसार, रात्री 11 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत कुठल्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही.

औरंगाबादमध्येही 5, 9 आणि 11वीच्या ट्यूशन बंद -पुण्या शिवाय महाराष्ट्रातील औरंगाबादमध्येही महापालिकेने 5 ते 9 आणि 11वीच्या ट्यूशन 15 मार्चपर्यंत बंद केल्या आहेत. मात्र, बोर्डाची परीक्षा असल्याने वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांना यातून सूट देण्यात आली आहे. महापालिका आयुक्त आस्तिक कुमार यांनी विद्यार्थ्यांची गर्दी थांबविण्यासाठी हा आदेश दिला आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासचा पर्याय देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे शुक्रवारी औरंगाबादेत तब्बल 247 कोरोना रुग्ण आढलून आले होते.

कोरोना रिटर्न्स; उपराजधानीत शुकशुकाट, बाजारपेठा बंदउपराजधानीत शुकशुकाट, बाजारपेठा बंद - कोरोनाच्या वाढत्या विळख्यामुळे प्रशासनाने शनिवार व रविवार असे दोन दिवस बाजारपेठा व दुकाने बंद करण्याचे आदेश दिले होते. त्या आदेशांची तंतोतंत अंमलबजावणी करत नागरिकांनीही सर्व व्यवहार बंद ठेवले. नागपूर शहरातील प्रमुख रस्ते, गर्दी ओसंडून वाहणाऱ्या बाजारपेठांमध्ये चिटपाखरूही दिसत नव्हते.

अमरावतीत पुन्हा लॉकडाऊन, 8 मार्चपर्यत मुदतवाढ -अंजनगाव सुर्जी नगरपालिकेचे क्षेत्रही आता कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात 1 मार्चच्या सकाळी 6 पासून 8 मार्चच्या सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू राहणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

कोरोना लस घेण्यासाठी अशी करा नोंदणी; जाणून घ्या सारी प्रक्रिया...

अमरावती, अचलपूर व अंजनगाव सुर्जी या शहरात सकाळी 8 ते 3 या वेळेत जीवनावश्यक सेवा, दुकाने सुरू राहतील. बिगर जीवनावश्यक दुकाने बंद राहतील. नोंदणीकृत व यापूर्वी परवानगीप्राप्त उद्योग सुरू राहतील. तिन्ही शहरांतील आठवडी बाजारही  बंद राहणार आहेत.

अशी आहे राज्याची स्थिती -महाराष्ट्रात आतापर्यंत जवळपास 21,46,777 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यांपैकी तब्बल 52,092 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. सध्या 73,734 कोरोनाबाधित रुग्णालयांत उपचार घेत आहेत. तर 20,20,951 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेSchoolशाळाcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका