शिक्षकाने केला शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 14:49 IST2018-05-04T14:49:40+5:302018-05-04T14:49:40+5:30
वाकड येथील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय शालेय विद्यार्थिनीवर वर्ग शिक्षकानेच विनयभंग केल्याचा प्रकार उघड झाला आहे.

शिक्षकाने केला शाळकरी विद्यार्थिनीचा विनयभंग
ठळक मुद्देएका इंगजी माध्यमाच्या शाळेतील प्रकार मुख्याध्यापक व शाळेच्या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे हिंजवडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघड
पिंपरी-चिंचवड : वाकड येथील खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या १३ वर्षीय शाळकरी विद्यार्थीनिवर वर्ग शिक्षकानेच बळजबरीचा प्रयत्न करीत विनयभंग केल्याचा प्रकार २७ एप्रिल रोजी शाळेत घडला.याबाबत श्रीनिवास थंडरवाला या शिक्षकाला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर बाल लैंगिक अत्याचार (पॉस्को) व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मुख्याध्यापक व शाळेच्या प्रशासकीय पदाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे हिंजवडी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे.