स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 06:53 IST2024-10-04T06:53:04+5:302024-10-04T06:53:40+5:30

पीडितांपैकी एक सहावर्षीय मुलगी नामांकित शाळेत शिकते. आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये-जा करत होती.

School van driver rapes two girls; An incident like Badlapur in Pune | स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना

स्कूल व्हॅन चालकाचा दाेन बालिकांवर अत्याचार; पुण्यात बदलापूरसारखी घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बदलापूर शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात तशीच घटना घडली आहे. स्कूल व्हॅन चालकानेच दोन ६ वर्षीय अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वानवडी पोलिसांनी संजय जेट्टींग रेड्डी (४५, वैदूवाडी, हडपसर) या व्हॅन चालकाला अटक केली आहे. 

पीडितांपैकी एक सहावर्षीय मुलगी नामांकित शाळेत शिकते. आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये-जा करत होती. ३० सप्टेंबर रोजी ती शाळेतून घरी आली असता तिला काहीतरी त्रास होत असल्याचे आईला जाणवले. आईने जवळ घेऊन प्रेमाने विचारले असता तिने संजय अंकल हा रोज अश्लील चाळे करत असल्याचे व चार दिवसांपासून हा प्रकार मैत्रिणीबरोबर देखील सुरू असल्याचे सांगितले. मुलीचे वडील शाळेत गेले. तसेच दुसऱ्या मुलीनेही तेच सांगितले. 

वानवडीमध्ये स्कूल व्हॅन चालकाकडून दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचारप्रकरणी आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देणार. तसेच, संस्थाचालकांची देखील चौकशी करण्यात येणार आहे.
- देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

Web Title: School van driver rapes two girls; An incident like Badlapur in Pune