शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 14:05 IST

बदलापूर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात दोन मुलींसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या व्हॅन चालकाला अटक करण्यात आली आहे.

Punc School Van Crime : बदलापुरच्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर अत्याचार झाल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा एन्काऊंटरमध्ये मारला गेला. मात्र यानंतरही अत्याचाराच्या घटना समोर येत असून राज्यातील मुली सुरक्षित नसल्याचे म्हटलं जात आहे. पुण्यात दोन शाळकरी मुलींसोबत अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकाकडून शाळकरी मुलींसोबत गैरप्रकार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्हॅन चालकाला अटक केली आहे.

पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये चालकाने दोन मुलींसोबत अश्लील चाळे केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या वानवडी परिसरात ३० सप्टेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. आरोपी व्हॅन चालक पीडित मुलींना गाडीच्या पुढच्या सीटवर बसवून त्याच्यांसोबत अश्लील चाळे करत होता. एका पीडित मुलीने तिच्या वडिलांना हा प्रकार सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याबाबत पीडित मुलीच्या आईने वानवडी पोलिसांत तक्रार दिली होती. पोलिसांनी याप्रकरणी  संजय जेटींग रेड्डी नावाच्या आरोपीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.

चार दिवसांपूर्वी पीडित मुलगी शाळेतून घरी आली तेव्हा तिने वडिलांकडे तक्रार केली होती. त्यानंतर वडिलांनी विश्वासात घेऊन मुलीकडे विचारणा केली असता तिने संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याचे सांगितले. संजय अंकल माझ्याबरोबर असणाऱ्या मैत्रिणीबरोबर अश्लील कृत्य करतात, असे पीडिततेने वडिलांना सांगितले. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी तिच्या मैत्रिणीच्या घरी जाऊन या प्रकाराबाबत माहिती दिली. दुसऱ्या मुलीनेही पालकांना संजय अंकल अश्लील कृत्य करत असल्याची माहिती दिली. त्यानंतर मुलीच्या आईने याप्रकरणी वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने तपास करत आरोपी व्हॅन चालक संजय रेड्डीला अटक केली.

या सगळ्या प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. "शाळेच्या व्हॅनमध्ये चालकाने मुलींना चुकीच्या पद्धतीने हात लावला. एका मुलीच्या पालकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. त्यानंतर आणखी एका मुलीला त्याने अशाच प्रकारे हात लावल्याचे समोर आले आहे. म्हणून त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थाचालकांनाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच या प्रकरणात आरोपीला पळून जाण्यासाठी मदत करण्यात आल्याचेही फडणवीस म्हणाले. "पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असे लक्षात आले की, स्थानिक काही नेत्यांनी त्याला पळून जाण्यात मदत केलेली आहे. अशा प्रकारच्या घटनांमध्ये मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपीवर कडक कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल," असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस